MD Ddrugs Selling Case : कन्नडमधून आणलेले एमडी ड्रग्ज विकताना दोघे जेरबंद File photo
छत्रपती संभाजीनगर

MD Ddrugs Selling Case : कन्नडमधून आणलेले एमडी ड्रग्ज विकताना दोघे जेरबंद

बायजीपुऱ्यातील ड्रग पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या

पुढारी वृत्तसेवा

Two arrested while selling MD drugs brought from Kannada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील कैलासनगर परिसरात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोन सराईत विक्रेत्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एमडी सदृश पदार्थ, मोबाईल, रोख रक्कम आणि मोपेड असा एकूण २ लाख ५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाचे धागेदोरे आता कन्नडपर्यंत पोहोचले आहेत.

राशीद सालमीन दिप (२५) आणि फैय्याज लतीफ शेख (३०, दोघेही रा. बायजीपुरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ७ मार्च रोजी मध्यरात्री १२:२० वाजेच्या सुमारास स्मशानभूमीकडून मोपेडवर (बर्गमन) आलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी अडवले.

त्यांची झडती घेतली असता राशीद दिप याच्याकडे सहा छोट्या पिशव्यांमध्ये मएमडीफ हा अंमली पदार्थ सापडला. फॉरेन्सिक तपासणीत हा अमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि वाहन असा एकूण २ लाख ५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कन्नडच्या काशीफचा शोध सुरू

प्राथमिक चौकशीत आरोपींनी हे ड्रग्ज कन्नड येथील काशीफ नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. पोलिस आता या मुख्य सूत्रध-ाराचा शोध घेत असून, या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT