साजापूर चौकात ट्रक लॉजवर धडकला चालक ठार, तर क्लिनर गंभीर जखमी file photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News : साजापूर चौकात ट्रक लॉजवर धडकला, चालक ठार, तर क्लिनर गंभीर जखमी

उड्डाणपुलाच्या कामामुळे सर्व्हिस रोडवर वळण घेताना झाला अपघात

पुढारी वृत्तसेवा

Truck crashes into a lodge at Sajapur Square; driver killed, cleaner critically injured

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : साजापूर चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे सर्व्हिस रोडकडे वळण घेणारा भरधाव ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या लॉजवर जाऊन धडकला. या भीषण अपघातात क्लिनर साईडला बसलेला ट्रकचालक जागीच ठार झाला, तर ट्रक चालविणारा क्लिनर गंभीर जखमी झाला. विनोद पांडे (३०, रा. इटावा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव असून, राघवकुमार (२१, रा. बिहार) हा गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक विनोद पांडे व क्लिनर राघवकुमार हे गुजरातच्या भावनगर येथून ट्रकमध्ये (जीजे-०४-एएक्स-९७९९) खाण्याचा सोडा भरून तो हैदराबाद येथे पोहचवण्यासाठी जात होते. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास करोडी टोलनाक्याजवळ चहा घेतल्यानंतर क्लिनर राघवकुमार हा ट्रक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग सीटवर बसला.

साजापूर चौकात उड्डाणपुलाच्या कामामुळे ट्रक सर्व्हिस रोडवर नेण्यासाठी वळण घेत असताना, राघवकुमारचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याशेजारील दामोधर लॉज वर जाऊन जोरात धडकला. धडकेमुळे लॉजच्या सिमेंटचे दोन कॉलम व भिंतीच्या ठिकऱ्या उडाल्या आणि ट्रकच्या कॅबिनचा डावा भाग आत घुसला. यात डाव्या बाजूला बसलेल्या विनोद पांडे यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस आणि वाळूज वाहतूक शाखेच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन क्रेनच्या मदतीने ट्रक बाजूला करून कॅबिनमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी विनोद पांडे यांना तपासून मृत घोषित केले. जखमी राघवकुमार याच्यावर सध्या घाटीत उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT