Accident News : डुलकीने घेतला जीव, कंटेनर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

डुलकी लागल्यामुळे कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला.
Accident News
Accident News : डुलकीने घेतला जीव, कंटेनर पलटी होऊन चालकाचा मृत्यूfile photo
Published on
Updated on

Accident News: Fatal Nap Container Overturns, Driver Dies

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा :

डुलकी लागल्यामुळे कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वडीगोद्री जालना मार्गावर धाकलगाव जवळ बुधवार, दि. १३ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मोहम्मद कैफ अली शेर रा. भरतपूर राजस्थान ३२ असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.

Accident News
Beed Crime| विज टॉवरच्या केबल्स चोरण्यासाठी पुण्याहून आली टोळी, पण टॉवरच कोसळल्याने दोन चोरट्यांचा जागीच मृत्‍यू!

दरम्यान, जालन्याहून बीड कडे कंटेनर क्रमांक एचआर ५५, एयू ५१७२ जात असताना वडीगोद्री जालना मार्गावरील धाकलगाव जवळ कंटेनर चालकाला अचानक डुकली लागली. यात त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले.

Accident News
Beed road accident : भावाच्या लग्नाची खरेदीसाठी आलेली बहीण अपघातात ठार

या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक किरण हावले व पोलिस कर्मचारी शेख यांनी घटनास्थळी पोहचले. त्यांनी मयताचे शव शवविच्छेदनासाठी वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news