Truck caught transporting illegal timber
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल के. आर. जाधव, वनरक्षक उज्ज्वला सोनवणे, दीपाली साळवे, वनसेवक अशोक आव्हाड, सय्यद शेख मकसूद तसेच वाहनचालक भाऊसाहेब वाघ यांच्या पथकाने रात्र गस्तीदरम्यान महत्त्वाची कारवाई ३ डिसेंबर रोजी रात्री करत अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त केला.
कन्नडड्ड तालुक्यातील चाळीसगाव रोडवरील जिओ पेट्रोल पंपाजवळ ताडपत्रीने झाकलेली ट्रक उभी असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. संशय आल्याने चालकास ताडपत्री उघडण्यास सांगितले असता ट्रकमधून अवैध निम व अडजात लाकूड (सुमारे ७ ते ८ टन) आढळले. वाहनचालकाकडून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ट्रकसह सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
यावेळी ट्रक क्र. एम एच ४ जीएफ २०८० लिंब व अडजात लाकूड (७ड्ड८ टन) एकूण किंमत अंदाजे १० लाख रुपये मिळून आला. आरोपी मुद्दस्सर फारूक बेग रा. मालेगाव यास ताब्यात घेऊन जप्त ट्रक व लाकूडमाल मक्रणपूर रोपवाटिकेत जमा करण्यात आला. भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कैलास जाधव करीत आहेत.
हा ट्रक मालेगावमधील लाकूड व्यापाऱ्याचा आहे. विना परवानगी वृक्षतोड व वाहतूक करताना आढळल्यास वनगुन्हा नोंदवून कडक कारवाई करण्यात येईल. अवैध वृक्षतोड, वाहतूक व लाकूडसाठा आढळून आल्यास वन विभागास कळवावे.शिवाजी टोम्पे, वनपरिक्षेत्र अधिकारी.