Sambhajinagar Tourism : देश, विदेशी पर्यटकांनी पर्यटनस्थळे गजबजली, बीबी का मकबऱ्याकडे पर्यटकांचा ओढा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Tourism : देश, विदेशी पर्यटकांनी पर्यटनस्थळे गजबजली, बीबी का मकबऱ्याकडे पर्यटकांचा ओढा

सण संपताच हळूहळू पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरूवात झाली आहे. स्थानिक, देश, विदेशी पर्यटकांची वर्दळ वाढण्यास सुरूवात झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Tourist spots are crowded with domestic and foreign tourists, tourists flock to Bibi Ka Maqbara

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सणांची धामधूम पाहुण्यांची उठबस आता कमी झाली आहे. या धामधुमीतून वेळ मिळताच अनेकांनी पर्यटनवारी सुरू केली आहे. स्थानिक, इतर राज्यातील तसेच विदेशी पर्यटकांची शहरात वर्दळ वाढली असून, बीबी का मकबर्याला अधिक पसंती असल्याचे तेथील गर्दीवरून दिसून येत आहे.

महाविद्यालय, शाळांना सुट्ट्या लागताच अनेक जण बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. त्याच वेळेस दिवाळीच्या सणांची धामधूम ही वेगळीच असते. या दिवसांचा पाहुणे, नातेवाईकांचा राबता जास्त असतो. त्यामुळे अनेकांनी दिवसभर कामात गुंतून राहावे लागते.

त्यामुळे गेले आठ ते दहा दिवस जिल्हाभरातील सर्वच पर्यटनस्थळांत शुकशुकाट दिसून येत होता. सण संपताच हळूहळू पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरूवात झाली आहे. स्थानिक, देश, विदेशी पर्यटकांची वर्दळ वाढण्यास सुरूवात झाली आहे. थंडीची चाहुल लागताच यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांनी दिली.

बीबी का मकबऱ्याकडे ओढा

बीबी का मकबऱ्याचे सौंदर्य न्याहळण्यासाठी दरवर्षी लाखो देश, विदेशी पर्यटक येत असतात. सणासुदीचे दिवस संपताच पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांची ओढा जास्त प्रमाणात बीबी का मकबऱ्याकडे दिसून येत आहे. विदेशी पर्यटक मात्र बीबी का मकबऱ्यासह दौलताबाद किल्ला, वेरूळ, अजिंठा लेणींना भेट देऊनच परतीच्या मार्गाला जात असल्याचेही येथील व्यवसायीकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT