Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेट Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

नवनिर्वाचित नगरसेवकांना कागदपत्रे सादर करण्याची आज अंतिम मुदत

महापौर निवडणुकीपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात मूळ प्रमाणपत्रे जमा करणे बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

Today is the final deadline for the newly elected corporators to submit their documents

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना आपली मूळ प्रमाणपत्रे, नमुना क्रमांक ३ तसेच घोषणापत्र आज सोमवारी (दि.९) विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही अंतिम मुदत असून, उद्याच्या महापौर निवडणुकीपूर्वी सर्व औपचारिकता पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आज सोमवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे. सर्व नगर सेवकांनी आपली मूळ प्रमाणपत्रे, नमुना क्रमांक ३ तसेच घोषणापत्र विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

दरम्यान, महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक मंगळवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात होणार आहे. या प्रक्रियेपूर्वी सर्व ११५ नगरसेवकांचे औपचारिक स्वागत करण्यात येणार असून, प्रत्येक नगर-सेवकाला फुल व विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नगरपालिकांच्या कामकाजावर आधारित सेवानिवृत्त नगरसचिव महबूब पठाण लिखित पुस्तक भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. तसेच महापौर व उपमहापौरांची निवड झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अधिकृत सत्कार करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया नियोजित वेळेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.

सभागृहात मोबाईलला बंदी

सभागृहात प्रवेश करताना नगरसेवकांनी आध-ारकार्ड, मतदार ओळखपत्र किंवा अधिकृत ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. सुर-क्षेच्या कारणास्तव सभागृहात मोबाईल फोन नेण्यास मनाई करण्यात आली असून, मोबाईल जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सभागृह परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT