पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरुणांना लुबाडले Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरुणांना लुबाडले

चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह मोबाईल पळवले

पुढारी वृत्तसेवा

Three young men preparing for police recruitment were robbed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच फोन पे वरून १ हजार ४०० व रोख साडेतीन हजारांसह मोबाईलही हिसकावून घेतला. या घटनेमुळे बाहेरून आलेल्या तरुणांत दहशत परसरली आहे. ही घटना २८ जानेवारी रोजी मध्यरात्री जाधववाडी भाजी मंडी परिसरात घडली.

या प्रकरणी निखिल विजय बुरकुल (१९, रा. पवननगर, एन-११ हडको) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, बुरकुल हा मित्र अनिकेत थुट्टे व प्रसाद शिंगणे यांच्यासोबत जाधववाडी भाजी मंडी परिसरात राईस खाण्यासाठी गेला होता. ते तिघे एका दुकानाजवळ बसलेले असताना एका स्कुटीवर तिघे तेथे आले.

त्यांनी तुम्ही दुकानाचे शटर फोडत आहात असा आरोप करत त्या तिघांना बेदम मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्या तिघांनी पीडित तरुणांचे मोबाईल काढून घेत चाकूचा धाक दवखवला व त्या तरुणांच्या फोन पे वरून एका महिलेच्या खात्यावर १ हजार ४०० रुपये वळते केले.

तसेच अनिकेत थुट्टे याच्या खिशातील १५००आणि प्रसाद शिंगणे याच्या खिशातील २ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी निखिल बुरकुल याने तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार मंगेश पवार करीत आहेत.

व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल

तुम्ही दुकान फोडत होता अशी धाक दाखवून कबुली घेत व्हिडिओ बनला. पुढे याच व्हिडिओच्या आधारे प्रत्येकी ५ हजार रुपये द्या. पैसे नाही दिल्यास थेट अकॅडमीत येऊन उचलून नेऊन मारून टाकू अशी धमकी देत ते तिघे पसार झाले. दरम्यान त्या तिघांनी रोख रक्कम, ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे पैसे तसेच दोन महागडे मोबाईल असा ३९ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटला. सार्वजनिक ठिकाणी, मध्यरात्री इतक्या निर्भीडपणे घडलेली ही घटना शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT