Sambhajinagar News : युवा मराठा क्रिकेट लीगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शनिवारचे तिन्ही सामने रंगतदार; खेळाडूंची दमदार कामगिरी
Sambhajinagar News
Sambhajinagar News : युवा मराठा क्रिकेट लीगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादfile photo
Published on
Updated on

The Young Maratha Cricket League received an enthusiastic response from the spectators

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : युवा मराठा प्रतिष्ठानच्या वतीने २१ ते ४५ वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या युवा मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या सिजनमध्ये शनिवारी (दि. ३१) रंगतदार सामने पार पडले. मागील तीन वर्षांपासून सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेतून उभारला जाणारा निधी समाजसेवेसाठी वापरण्यात येत असल्याने हा उपक्रम क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ठरत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Sambhajinagar News
Drug Trafficking : तस्कर टोळीकडून २० ग्रॅम एमडी ड्रग्जसह तलवार जप्त

शनिवारच्या पहिल्या सामन्यात प्रजापिता पँथर्स आणि सिएरा स्टॅलियन्स यांच्यात लढत झाली. प्रजापिता पँथर्सने दमदार खेळ करत ४८ धावांनी विजय मिळवला. आर. के. याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. दुसऱ्या सामन्यात कुलस्वामिनी किंग्स विरुद्ध मराठा वॉरियर्स यांच्यात सामना झाला.

मराठा वॉरियर्सने सहा गडी राखून सहज विजय मिळवला. निखिल चौधरी याने प्रभावी गोलंदाजी करत तीन षटकांत चार गडी बाद केले. विशेष म्हणजे त्याने हॅटिक साधत सामनावीराचा किताब पटकावला.

Sambhajinagar News
सावंगी जिल्हा परिषद गटात भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ

तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात नंदिनी टायटन्स आणि वीर छावा ११ यांच्यात सामना झाला. नंदिनी टायटन्सने २८ धावांनी विजय मिळवला. दक्ष काकडे ५८ धावांची खेळी करत सामनावीर ठरला. दरम्यान, या स्पर्धेत एकूण आठ संघांचा सहभाग असून सामने १ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news