शिवसेना उपतालुकाप्रमुखावरील चाकूहल्लाप्रकरणी तिघांना अटक File Photo
छत्रपती संभाजीनगर

शिवसेना उपतालुकाप्रमुखावरील चाकूहल्लाप्रकरणी तिघांना अटक

चाकूहल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गुरुवारी (दि.१२) सकाळी अटक केली.

पुढारी वृत्तसेवा

Three arrested in knife attack case involving Shiv Sena Deputy Taluka Chief

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख श्रीकृष्णा राठोड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यावर चाकूहल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गुरुवारी (दि.१२) सकाळी अटक केली.

सुनील सुभाष गाढे (२३, रा. डोमेगाव, ता. गंगापूर, ह.मु. साऊथ सिटी), कृष्णा राजू वैरागळ (२१, रा. कचनेर, ह.मु. हर्मूल-सावंगी) व श्याम संतोष भालेराव (२१, रा. हर्मूल-सावंगी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्णा राठोड यांचे वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकाजवळ हॉटेल आहे. ९ मार्च रोजी रात्री राठोड आपले हॉटेल बंद करून संजय राठोड आणि अनिल राठोड यांच्यासह कारने घराकडे जात होते. यावेळी हॉटेललगत असलेल्या एका बिअर बारसमोर सुनील गाढे, कृष्णा वैरागळ व श्याम भालेराव हे रस्त्यावर दुचाकी लावून उभे होते.

राठोड यांनी त्यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले असता, आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींपैकी एकाने श्रीकृष्णा राठोड यांच्या पोटात चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेले मुकेश राठोड यांच्यावरही आरोपींनी चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या मदतीने एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आज सकाळी तिघांनाही बेड्या ठोकल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT