गळक्या टँकरमुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी file photo
छत्रपती संभाजीनगर

Gangapur : गळक्या टँकरमुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी

दुष्काळात वाढीव खेपांचा खर्चही वाढला, नागरिकांत संताप

पुढारी वृत्तसेवा

Thousands of liters of water are wasted every day due to leaky tankers

रमाकांत बन्सोड

गंगापूर : तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी पोहोचविणाऱ्या टँकरमधूनच मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक टँकरमधून गळती होत असल्याने गावापर्यंत पोहोचेपर्यंत पाण्याचे मोठे प्रमाण रस्त्यावरच वाहून जात आहे इंधन व दुधाच्या टँकरला गळती लागत नाही, मग पाण्याचेच टँकर गळके का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

चालू वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. दुष्काळाची सर्वाधिक झळ सोसणाऱ्या गावांना वाड्यांना शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, यापैकी अनेक टँकरची अवस्था समाधानकारक नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

टाकीला असलेल्या गळतीमुळे मंजूर क्षमतेइतके पाणी गावात पोहोचत नसल्याने नागरिकांना प्रत्यक्षात कमी पाण्यावर समाधान मानावे लागत आहे. गळतीमुळे वाढल्या टँकरच्या खेपाटँकरला गावापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था असल्याने गळतीचे प्रमाण आणखी वाढत असल्याचे सांगितले जाते. परिणामी टँकरमध्ये भरलेले पाणी पूर्ण क्षमतेने गावात पोहोचत नाही.

पाणी कमी पडल्याने अतिरिक्त खेपा घ्याव्या लागतात आणि त्याचा थेट परिणाम शासनाच्या खर्चावर होत आहे. गळतीमुळे दररोज नेमके किती पाणी वाया जाते, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्याने या नासाडीचा नेमका आर्थिक फटका किती बसतो, याचाही ताळमेळ लागत नाही. गळती असलेल्या टँकरची वेळेत दुरुस्ती करून त्यांचा वापर केल्यास वाढीव खेपा कमी होऊन शासनाचा मोठा खर्च वाचू शकतो, अशी नागरिकांची भूमिका आहे.

गंगापूर. दुष्काळग्रस्तांच्या हक्काचे पाणी रस्त्यातच वाहून जात असेल, तर ही केवळ नासाडी नसून प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह आहे टँकरची नियमित तपासणी करून गळती असलेले टँकर तातडीने सेवेतून बाजूला करावेत आणि मंजू क्षमतेइतकेच पाणी प्रत्यक्ष गावकऱ्यांना मिळते क नाही, याची प्रशासनाने कठोर तपासणी करावी

गळती थांबवा, खेपा कमी करा' दुष्काळी भागात पुरेसे पाणी मिळत नसल्याने टँकरच्या खेपा वाढवाव्या लागत आहेत. त्यातच टँकरमधून वाहतुकीदरम्यान पाण्याची नासाडी होत असेल तर ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. एका बाजूला नागरिक पाण्यासाठी संघर्ष करीत असताना दुसऱ्या बाजूला शासनाच्या खर्चातून आणलेले पाणी रस्त्यावर वाया जाणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे.
- कविता रवींद्र चव्हाण, सभापती, पंचायत समिती
गंगापूर. गळती असलेल्या टँकरची तातडीने तपासणी करून त्यांची दुरुस्ती करावी अथवा ते पाणीपुरवठ्यातून बाजूला काढून सुस्थितीतील टँकर उपलब्ध करून द्यावेत. गळती असलेल्या टँकरची जबाबदारी निश्चित करून संबंधितांकडून खुलासा घ्यावा आणि पाणीपुरवठा व्यवस्थेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी.
- राजेश्वर हिवाळे, उपसभापती पंचायत समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT