चोरट्यांनी सहा तोळ्यांचे सोन्याचे, एक किलो चांदीचे दागिने चोरलेf file photo
छत्रपती संभाजीनगर

चोरट्यांनी सहा तोळ्यांचे सोन्याचे, एक किलो चांदीचे दागिने चोरले

शिवना येथे देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले

पुढारी वृत्तसेवा

Thieves stole gold ornaments worth six tolas and one kilo of silver

अजिंठा, पुढारी वृत्तसेवा सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचे घर चोरट्यांनी फोडले. कपाटातील ६ तोळे ९ ग्रॅम सोन्याचे दागिने व एक किलो चांदीचे दागिने चोरून नेले.

शिवना येथील वैशाली संजय गुप्ता या बुधवारी (दि.११) सायंकाळी पती व मुलासह नागपूर येथे लग्नसमारंभासाठी गेल्या होत्या. समारंभ आटोपल्यानंतर त्या शुक्रवारी (दि.१३) राजस्थानमधील खाटू श्याम बाबा यांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दरम्यान, सोमवारी शेजाऱ्यांनी दूरध्वनीवरून त्यांच्या घराच्या बाहेरील दरवाजाला केवळ कडी लावलेली दिसत असल्याची माहिती दिली.

ही माहिती मिळताच घाबरलेल्या गुप्ता यांनी शेजारी व नातेवाइकांना घराची पाहणी करण्यास सांगितले. पाहणीदरम्यान घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे देवदर्शनाचा दौरा अर्धवट सोडून त्या कुटुंबासह घरी परत आल्या. शुक्रवारी रात्री (दि.२०) अजिंठा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या व घटनेची तक्रार नोंदविली.

चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यात ठेवलेले सुमारे ६ तोळे ९ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच अंदाजे एकूण एक किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी गुप्ता यांच्या फिर्यादीवरून अजिंठा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे पुढील तपास करीत आहेत.

या दागिन्यांचा समावेश

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व आतील कपाट फोडून त्यात ठेवलेले सुमारे ६ तोळे ९ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. दागिन्यांत हातातील अंगठ्या, कानातील झुमके, नथ, लहान मुलांच्या अंगठ्या, नेकलेस यांचा समावेश होता. एक किलो चांदीच्या दागिन्यांत पायातील पैंजण, कमरेचा पट्टा व चांदीचे बिस्किटे यांचा समावेश होता. दरम्यान, चोरीची घटना झाल्याने गावात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT