Sillod Crime News : चोरट्यांनी घरातील तिजोरी फोडली, पन्नास लाखांचा मुद्देमाल लांबवला  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod Crime News : चोरट्यांनी घरातील तिजोरी फोडली, पन्नास लाखांचा मुद्देमाल लांबवला

अन्वी येथील घटना, रोख रक्कम, पस्तीस तोळे सोन्याचे दागिने लंपास

पुढारी वृत्तसेवा

Thieves broke the cupboard in the house and away theft fifty lakhs worth of goods

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : रात्री घरी कुणी राहत नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराची कुलूप तोडून आत प्रवेश करत तिजोरी फोडून त्यातील रोख १३ लाख व जवळपास ३५ ते ४० लाख रुपये किमतीचे ३५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. या घटनेने अन्वीत एकच खळबळ उडाली असून, चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरणी गुरुवारी (दि.२५) रात्री सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी योगेश गोपालराव भवर (रा.अन्वी) हे कुटुंबासह सिल्लोड येथे राहतात. गावाकडे शेती व घर असून, दररोज शेतीच्या कामाने गावात जातात. शेती कामे आटोपून सायंकाळी सिल्लोडला परत येतात. यामुळे गावातील घरी रात्री कुणी राहत नाही. हीच संधी साधत चोरट्यांनी बुधवारी (दि.२४) रात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील तिजोरी फोडून रोख १३ लाख व जवळपास ३५ ते ४० लाख रुपये (आजची किंमत) किमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिने, बिस्किटे असा जवळपास ५० लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले.

गुरुवारी (दि. २५) सकाळी एका नागरिकाला घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने ही माहिती फिर्यादी यांना दिली. त्यांनी तातडीने गाव गाठले व घरात जाऊन पाहणी केली असता मोठी घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, लहू घोडे, बिट जमादार सचिन काळे, रविकिरण भारती यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र बनकर करीत आहेत.

श्वान पथक पाचारण

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासासाठी छत्रपती संभाजीनगर येथून ठसे तज्ज्ञ परमेश्वर आडे यांची टीम तसेच श्वानपथकाला पाचारण केले होते. तिजोरी व साहित्यावरील बोटांचे ठसे हस्तगत करण्यात आले असून, तांत्रिक बाबी तपासात पोलिस तपास करीत आहेत. घरफोडीतील आर- ोपींना लवकरच जेरबंद करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैद

अन्वी गाव छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरून अवघे तीन किमी अंतरावर आहे. गावातून जाणारा रस्ता पुढे भोकरदन तालुक्याला जोडला गेल्याने रात्रभर गावातून वाहनांची येजा चालू राहते. यामुळे वाहनांवर तसेच जाणाऱ्या-येणाऱ्यांवर फारसे कुणी लक्ष देत नाही. याचा फायदा घेत चोरट्यांनी मोठा डल्ला मारला. मात्र घरफोडी झालेल्या शेज-रीिल एका सीसीटीव्हीत चोरटे कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घरफोडी करणारे पाच जण असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT