CIDCO News : सिडको वाळूज महानगरात चोरट्यांनी तीन घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास File Photo
छत्रपती संभाजीनगर

CIDCO News : सिडको वाळूज महानगरात चोरट्यांनी तीन घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास

जुन्या इमारतीचाही होणार कायापालट, वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर

पुढारी वृत्तसेवा

Thieves break into three houses in CIDCO Waluj Metropolis; Property worth lakhs looted

महानगर, पुढारी वृत्तसेवा : एकाच

सोसायटीमधील तीन बंद घरे फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि.१८) सिडको वाळूज महागरातील पुष्पक रेसिडेन्सीमध्ये घडली. या भागात चोरट्यांकडून भरदिवसा तसेच रात्रीच्या वेळी बंद घरे टार्गेट केली जात असल्याने कामगारवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या विषयी पोलिसांनी सांगितले की, नारायण गडकर (३०, रा. पुष्पक रेसिडेन्सी, सिडको वाळूज महानगर-१) हे १८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घराला कुलूप पत्नी कावेरी तीन वर्षांचा मुलगा अद्वेत यांना सोबत घेऊन त्यांची आई लताबाई यांना दवाखान्यात घेऊन गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी गडकर यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून बेडरूमधील कपाटातून १ तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, ५ ग्रॅमची आंगठी, साडेतीन ग्रॅमची पोत व मणी असा जवळपास १ लाख ११ हजार ९४५ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

त्याचबरोबर चोरट्यांनी गडकर यांच्या शेजारी राहणाऱ्या अमोल गाडेकर यांच्या दाराचा कडी-कोयंडा तोडून त्यांच्या घरातून रोख ३० हजार रुपये चोरले. त्यानतंर चोरट्यांनी आपला मोर्चा याच इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या बाळासाहेब राऊत यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या बंद घराच्या दाराचा कडी-कोयंडा तोडून घरातून साडेसात ग्रॅम वजनाचे झुंबर, अडीच ग्रॅमच्या दोन बाळ्या, दोन आंगठ्या, मंगळसूत्र असा जवळपास ८२ हजार ४३ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. एकूण २ लाख २३ हजार ९८८ रुपये किमतीचा ऐवज चोरी प्रकरणी नारायण गडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT