Temple Theft Case : बजाजनगर येथील स्वामी समर्थ मंदिरात चोरी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Temple Theft Case : बजाजनगर येथील स्वामी समर्थ मंदिरात चोरी

सोन्याची चेन, चांदीच्या पादुकांसह लाखो रुपये लांबवले

पुढारी वृत्तसेवा

Theft at Swami Samarth Temple in Bajaj Nagar

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : बजाजनगर येथील चिंचबन कॉलनीतील श्री स्वामी समर्थ मंदिराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी मूर्तीवरील १ तोळ्याची सोन्याची चेन, दीड किलो वजनाच्या चांदीच्या पादुका आणि दोन दानपेट्या फोडून १ लाख रुपयांची रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. १६) पहाटे उघडकीस आली. वाळूज महानगर परिसरात घरफोडी व चोरीच्या घटना वाढल्या असताना आता चोरट्यांनी मंदिरांना लक्ष्य केल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बुधवारी रात्री आरतीनंतर मंदिर बंद करण्यात आले होते. गुरुवारी पहाटे ५ वाजता शंकर पतंगे हे मंदिरात आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने मंदिर समितीला माहिती दिली. मंदिराचे अध्यक्ष संतोष पाटील, हर्षल बेंडाळे, गोपाळ पाटील, नरसिंह राऊत आणि एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.

चोरट्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील सोबत पळवून नेला आहे. संतोष पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT