जि.प.चा प्रचार थंडावला file photo
छत्रपती संभाजीनगर

जि.प.चा प्रचार थंडावला

६३ गट, १२६ गणांसाठी उद्या मतदान, यंत्रणा सज्ज

पुढारी वृत्तसेवा

The Zilla Parishad election campaign has stopped

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा गेल्या २० दिवसांपासून उडालेला धुराळा गुरुवारी (दि.५) रात्री उशिरा शांत झाला. आता उद्या शुक्रवारी (दि.७) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मतदानाआधी उमेदवारांकडे अवघ्या एक दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने मतदारांच्या गाठी-भेटी सुरू केल्या आहेत. तर गुरुवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय पक्ष व उमेदवारांची गावोगावी धावपळही पहायला मिळाली.

जिल्हा परिषद, समिती पंचायत निवडणुकीची अधिसूचना १६ जानेवारीला प्रसिद्ध झाली. तर उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर खऱ्याअथर्थान प्रचाराला रंगत आली. जिल्हा परिषदेचे ६३ गट आणि पंचायत समितीच्या १२६ गणांमधील सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत आहे.

या निवडणुकीसाठी जिल्हाभरात ८३० उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये जिल्हा परिषद गटांसाठी २८२ आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान, विविध राजकीय पक्षाचे नेतेमंडळांनी घेतलेल्या जाहीर सभा, कॉर्नर बैठक यामुळे गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सोबत उमेदवारांनी प्रचारफेऱ्या, पदयात्रा काढत जास्तीत मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी सायंकाळी थंडावल्या आहे.

मुदतवाढीचा फायदा !

निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार होते. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शासनाने तीन दिवस शोक जाहीर करून शासकीय दुखवटा पाळला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रचारासाठी दोन दिवस मुदत वाढ केली. त्यामळे ५ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रचार संपला.

१८ लाख ७३ हजार ५३ एकूण मतदार

जिल्ह्यातील ६३ गटांतील आणि १२६ पंचायत समिती गणातील २ हजार २८२ मतदान केंद्रांवर आता ७ फेब्रुवारीला सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २४८९ पोस्टल मतदार आहेत. तर १८ लाख ७३ हजार ५३ एकूण मतदार आहेत. यात ९ लाख ७९ हजार पुरुष व ८ लाख ९३ हजार ७७८ महिला मतदार आहेत. ४१ मतदार तृतीयपंथीय आहे. २२८२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सुमारे १२ हजार कर्मचारी लागणार आहेत. तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT