The Youti in Sambhaji Nagar is on the verge of breaking up
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेला देण्यात आलेल्या ३७-५० जागांच्या प्रस्तावावरून युती तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. नक बैठकांनंतरही दोन्ही पक्षांत जागांबाबत एकमत झालेले नाही, भाजपाकडून सातत्याने वेगवेगळे प्रस्ताव देत शिवसेनेला खेळविले जात असल्याचा आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनीच सोमवारी (दि. २९) शिवसैनिकांसमोर बोलताना केला. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटची मुदत आहे.
भाजपने दिला 37-50 प्रस्ताव
शिवसेनेच्या उत्तराची प्रतीक्षा युतीधर्म पाळण्यासाठी प्रयत्न छत्रपती संभाजीनगर: महापालिकेची निवडणूक हो महायुतीतच लढायची आहे. यासाठी भाजपाने युतीधर्म पाळून पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्राबल्य अगलेल्या ७-८ जागा शिवसेनेला दिल्या, त्यांच्या सूचनेनुसारच सोमवारी (दि. २९) सायंकाळी ३७-५० च्या जागा वाटपाचा फाम्युला पालकमंत्री संजय शिरसाट यांना पाठविला असून, आता त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा करीत आहोत, असे भाजपचे जिल्हा प्रभारी तथा ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीसाठी गेल्या आठवडाभरापासून शिवसेना भाजप युतीत जागा वाटपाचे गुरुहाळ सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेला जास्त जागा मिळाव्यात, अशी शिवसेनेची मागणी आहे. तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षांत परिस्थिती बदलल्याचे सांगत आम्हीच मोठा भाऊ आहोत, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यानुसार भाजपने शिवसेनेला केवळ ३७ जागा देऊ केल्या आहेत. याची माहिती मिळताच संतप्त शिवसैनिकांनी सोमवारी रात्री पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला.
त्यावेळी शिरसाट यांनी जागा वाटपाच्या बैठकींबाबतची संपूर्ण हकिकत कथन केली शिरसाट म्हणाले, बरिष्ठांनी युती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून मवाळ धोरण ठेवले. भाजपच मोठा भाऊ हेही मान्य केले. परंतु सुरुवातीला त्यांनी केवळ ३३ नामाच देऊ केल्या, कालपर्यंत चर्चा सुरू होती. त्यानंतरही त्यांनी सतत प्रस्ताव बदलून दिले. कधी ३४ टक्केच जागा देऊ केल्या. काल शेवटची बैठक झाली. त्यात त्यांनी भाजप ५३ आणि शिवसेना ३० जागांचा प्रस्ताव दिला. आम्ही त्यांना ४३, ४१ जागांचा प्रस्ताव दिला. त्यांनी आज कळवितो, असे सांगितले. पण फोन केल्यानंतर सहा सहा तास त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आजही आतापर्यंत कोणताही प्रतिसाद ठाकरे बंधू असल्याने शिंदे गट प्रयत्नदेखील करणार नाही.
त्यामुळे धंगेकर यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पनवेलमध्ये ७८ जागांपैकी ७१ जागा भाजप लढवणार असून, शिंदे गटाला ४ तर अजित पवार गटाला २ जागा सुटल्या आहेत. रिपाइं आठवले गटाला १ जागा देण्यात आली. इथे महायुती अभंग राहिली. पनवेलमध्ये शेकाप-शरद पवार गट-उद्धव ठाकरेंची शिवसेना हे तिघे एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीचे चित्र मात्र अद्याप स्पष्ट नाही. अलीकडच्या बैठकीनुसार ७८ जागांपैकी शेकाप सर्वाधिक ३८ ते ४०, उद्धव ठाकरेंची शिवसेना २०, शरद पवार गट २, मनसे ४, सपा १, आणि काँग्रेस ११ असे जागावाटप होऊ शकते.
सोमवारी रात्री उशिरा किंवा मंगळवारी सकाळी निर्णय झालेला असेल आणि उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांच्या हाती एबी फॉर्म्स ठेवले जातील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मीरा भाईंदरमध्येही महायुतीत जागावाटपावरून बिनसल्याने भाजपने सर्व ९५ जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसही येथे स्वतंत्रपणे लढत आहे, तर ठाकरेंची शिवसेना ७६, मनसे १३ तर शरद पवारांची राष्ट्रवादी ६ जागांवर आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहे.
भिवंडीमध्ये ९० जागा असून येथे भाजप आणि शिवसेना यांची युती जाहीर झाली असून भाजप ३० तर शिवसेना २० जागांवर लढणार आहे. उर्वरित जागांवर उमेदवारांचा शोध सुरू असून उमेदवार न मिळाल्यास तेथे अपक्षांना उमेदवारी देण्याचा निर्णय या दोन पक्षांमध्ये झाल्याचे समजते. कल्याण-डोंबिवलीसाठी रात्री उशिरापर्यंत भाजप आणि शिवसेनेत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. १२२ जागांपैकी कल्याण पूर्वेतील २५ जागांवर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली होती. भाजपने येथून ९ जाणांना एबी फॉर्म दिले आहेत; तर दुसरीकडे शिवसेनेने आपली यादी जाहीर केली नव्हती.
उल्हासनगरमध्ये जागावाटपात तोडगा निघू न शकल्याने शिवसेना-भाजप स्वबळावर ही निवडणूक लढणार आहेत. ७८ जागांपैकी गेल्या निवडणुकीत शिवसेनेने २५, भाजप आणि टीम ओमी कलानी युतीने ३१ जागा जिंकल्या होत्या. वसई-विरारमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती झाली असून दुसरीकडे बहुजन विकास आघाडी, मनसे आणि काँग्रेस अशी आघाडी या निवडणुकीत उतरली आहे, तर ठाकरे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतील. ११५ जागा असलेल्या या महापालिकेत गेल्यावेळी बहुजन विकास आघाडीने १०७ जागा जिंकल्या होत्या.