The young man was robbed at knifepoint.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चाकूचा धाक दाखवून तरुणाला फोनपेमार्फत ऑनलाईन ४ हजार रुपये आणि दुसऱ्या एकाचा मोबाईल चौघांनी लुटून नेला. ही घटना गुरुवारी (दि.८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास उत्तरानगरी येथे घडली. विजय विशाल हिवराळे (२२, रा. ब्रिजवाडी) आणि त्याचे तीन साथीदार अशी आरोपींची नावे असून हिवराळेला तरुणींनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
तक्रारदार शुभम राजेंद्र देहाडराय (२८, रा. शेवगाव, सध्या रा. छत्रपती संभाजीनगर) हा ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसह उत्तरानगरीतील जाईजुई अपार्टमेंटसमोर उभा होता. यावेळी चार अनोळखी इसम तेथे आले. त्यातील एकाने चाकूचा धाक दाख-वून शुभम आणि त्याच्या मित्रांना धमकावले व मारहाण केली. आर-ोपींनी तरुणांकडे पैशांची मागणी केली.
खिशात पैसे नसल्याचे समजल्यावर, घरच्यांकडून पैसे मागवून घ्या, नाहीतर येथेच कापून फेकून देऊ, अशी धमकी त्यांनी दिली. घाबरलेल्या शुभमने आपल्या मामांकडून ४ हजार रुपये स्वतःच्या फोन पे वर मागवून घेतले आणि आरोपींनी सांगितल्यानुसार विकास भिंगरदिवे नावाच्या व्यक्तीच्या स्कॅनरवर पाठवले. याशिवाय, आर-ोपींनी रिहान बागवान या तरुणाचा १० हजारांचा मोबाईल देखील जबरदस्तीने हिसकावून घेतला.
दुसऱ्या दिवशी तरुणांनीच लुटारूला पकडले
दुसऱ्या दिवशी (९ जानेव-ारी) तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जात असताना, फिर्यादीला ए.पी.आय. कॉर्नर येथील वाईन शॉपसमोर लुटणाऱ्यांपैकी एक जण दिसला. तरुणांनी धाडस दाखवून आरोपी विजय हिवराळेला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक विष्णू मुंढे करत आहेत.