The 'Yoga' path to good health
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर: आजच्या धकाधकीच्या जीवनात योग हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी एक प्रभावी साधन आणि प्राचीन पद्धत आहे. नियमित योगाभ्यासामुळे अनेक शारीरिक तक्रारींपासून सुटका होते. मन प्रसन्न राहते. तणाव कमी होऊन एकाग्रता, आत्मविश्वास वाढतो. इतकेच नव्हे तर समाधान आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
दरवर्षी २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करणे, हा उद्देश असून, योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येतात.
सुरुवातीला योग शिक्षकांकडून योगासने शिकून घ्यावी. १० वर्षांपुढील सर्व जण योग साधना करू शकतात. नियमित योगा केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. स्नायू मजबूत होऊन लवचिकता वाढते. रक्ताभिसरण उत्तम राहते. तसेच सांधे, कंबरदुखी, रक्तदाब, थॉयराईड सारख्या अनेक व्याधी, लहान आज-ारांवर नियंत्रण मिळते. योग, ध्यानसाधनेमुळे मन संतुलित राहते.
नियमित योग केल्याने रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, अँझायटी आणि निद्रानाश यासारख्या अनेक तक्रारींवर नियंत्रण मिळते. योग हा स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी एक उत्तम उपाय आहे. डॉक्टरांसह सर्वांनी आवर्जून योगसाधना करावी. मी स्वतः गेली अनेक वर्षे नियमित योग करतो.डॉ. अनुपम टाकळकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन.
योगसाधनेमुळे मन प्रसन्न होऊन मानसिक स्वास्थ्य सुध-ारते. नैराश्य, तणाव, चिडचिड, अँझायटी आणि निंद्रानाश यावर नियंत्रण मिळते. मेंदूला आणि शरीराला रक्तपुरवठा वाढतो. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित योगसाधना करावी, याचा चांगला फायदा होतो.डॉ. मेराज कादरी, मानसोपचारतज्ज्ञ.
योगसाध-नेतून शरीर व मन तंदुरुस्त राहते. योग शिक्षकाकडून धडे घ्यावे. रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या ४ तासांनंतर योगसाधना करावी. दुसऱ्यांचे अनुकरण न करता आपल्या शरीराचे ऐकावे.शिवशंकर स्वामी, योग शिक्षक.