The world is destroyed; Panchnama should be done urgently: MLA Abdul Sattar
मन्सुर कादरी
सिल्लोड,ः रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सिल्लोड तालुक्यात पुन्हा एकदा हाहाकार माजवला. सततच्या पावसामुळे पिकांचे, शेतीचे व सिंचन प्रकल्पांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
पाझर तलावाच्या भगदाडाने भीतीचे वातावरणनिल्लोड येथील पाझर तलाव क्रमांक ०१ च्या धरणभिंतीला भगदाड पडून गळती सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पावसाच्या पाण्याने शेताबरोबरच अनेकांच्या संसारालाही झळ पोहोचली. शेतकरी डोळ्यांत पाणी आणून आपले दुःख व्यक्त करत असताना, या गंभीर परिस्थितीची पाहणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. त्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच तलवाडा, गव्हाली, कायगाव, बनकिन्होळा परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतल्या.
अतिवृष्टीमुळे अनेक घरांत पाणी शिरून संसार उद्ध्वस्त झाले आहेत. याचे पंचनामे करून अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश आमदारांनी तहसीलदार, तलाठी व ग्रामसेवकांना दिले. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने संवेद-नशीलतेने मदतीचे हात पुढे करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे विशेषतः काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, स्वतःची व पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या पाहणीवेळी तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, बाजार समितीचे सभापती विश्वास पा. दाभाडे, संचालक नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, हनिफ मुलतानी, अक्षय मगर, जमीर मुलतानी, पांडुरंग जैवळ, अस्लम शेख आदींसह शेतकरी, ग्रामस्थ व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.