

Leaders just for photos? Where is the help? Farmers question
दत्तात्रय काटोले
सोयगाव : जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून, शेतकऱ्यांच्या पदरात फक्त नुकसानच उरले आहे. अनेक भागांत कापूस, तूर, मका, सोयाबीन, नागवेलीचे पानमळे, केळी, मोसंबी, यासारखी उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. पाणी साचल्याने शेतातच नव्हे तर घराघरांत पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा संकटाच्या काळात नेत्यांचा मफोटोशूट दौरा धडाक्यात सुरू आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर दौरे सुरू केले आहेत. मात्र हे दौरे ममदतीचेफनसून मफोटोशूटचेफ असल्याची टीका शेतकरीवर्गातून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दोन फोटो काढायचे, ते सोशल मिडियावर टाकायचे निघून जायचं एवढाच मसेवा भावफ सध्या काही जणांत दिसत असल्याची टीका होत आहे.
पावसामुळे नुकसान झाल्याचे पंचनामे व्हावेत म्हणून अनेक शेतकरी वारंवार अधिकाऱ्यांना फोन करत आहेत. मात्र अनेक अधिकारी प्रतिसाद देत नाहीत.
याउलट कोणी मोठा राजकीय नेता गावात आला, तर त्याच्या मागे पंचनामे करणारे अधिकारी हजर ङ्गपंचनाम्याऐवजी फोटोशूटच महत्त्वाचं आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सणासुदीचा काळ, पण घरात काळोख दसरा, दिवाळीसारखे सण उंबरठ्यावर आले असतानाही शेतकऱ्यांच्या घरी मात्र सण नाही, संकट आहे. अनेकांनी फुलशेती करून चांगला दर मिळेल, कर्ज फेडू आणि मुलाबाळांचे लग्न करू, अशी आशा ठेवली होती. मात्र पावसाने फुलशेतीसुद्धा उद्ध्वस्त केली. सोयगाव तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
शासनाकडून तात्काळ मदत, नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि प्रभावी पंचनाम्यांची गरज आहे, अशी भावना आता व्यक्त होत आहे.