The second phase of the census will begin on January 25th
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याला २५ जानेवारी २०२७ पासून प्रारंभ होणार असून, यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाणार आहे. या प्रक्रियेत नागरिकांना वेब पोर्टलद्वारे स्वतःची माहिती भरण्यासाठी स्वगणनेचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जनगणनेचे काम अचूक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी ५,३१७ प्रगणक, ७३९ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून माहिती संकलनाला सर्व प्रगणकांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी (दि. १८ प्रशिक्षणात दिले.
यावेळी जनगणना संचालनालयातून उपसंचालक सुनील आत्राम, जनगणना अन्वेषक मयुर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते उपस्थित होते. तर प्रशिक्षणासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत घरयादी आणि घरगणनेच्या स्वरूपात पार पडला. आता दुसऱ्या टप्प्यात २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रत्यक्ष लोकसंख्या गणना होईल. त्यानंतर १ ते ५ मार्चदरम्यान फेरतपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, १० ते २४ जानेवारी या कालावधीत नागरिकांना वेब पोर्टलवर स्वगणना करता येणार आहे.
४० प्रश्न असणार
जनगणनेसाठी तालुकानिहाय प्रशिक्षणासाठी १०६ प्रशिक्षक नेमले आहेत. या जनगणनेत एकूण ४० प्रश्न विचारले जाणार असून, प्रत्येक माहितीची अचूक नोंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून जनगणना वेळेत पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केल