Social Media| सोशल मीडियावर सायबर पेट्रोलिंगद्वारे पोलिसांची नजर Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

सोशल मीडियावर सायबर पेट्रोलिंगद्वारे पोलिसांची नजर

आचारसंहितेच्या काळात जातीय सलोखा बिघडवणारे कृत्य किंवा चिथावणीखोर मजकूर पसरवणाऱ्यांवर आवर घालण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

The police are keeping a watch through cyber patrolling on social media.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: आचारसंहितेच्या काळात जातीय सलोखा बिघडवणारे कृत्य किंवा चिथावणीखोर मजकूर पसरवणाऱ्यांवर आवर घालण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, त्यांनी सायबर पेट्रोलिंग तीव्र केली आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह आढळलेल्या २७ पोस्ट्स सायबर सेलने हटवल्या आहेत. रिल्सवरील गाण्यांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारावरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ९ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर २४ तास लक्ष ठेवून आहे. विशेषतः रिल्समध्ये वापरली जाणारी गाणी, त्यातील शब्दरचना आणि त्यातून दिला जाणारा संदेश यावर बारीक लक्ष दिले जात आहे. यातून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोस्ट डिलिट करण्यात येत आहे. संबंधित पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्यास त्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करणार आहेत.

गोपनीयता राखाः वैयक्तिक टीका किंवा चारित्र्यहनन करणारे रिल्स आणि व्हिडिओ शेअर करणे टाळावे, नागरिकांना आक्षेपार्ह पोस्ट दिसल्यास सोशल मीडियावर रिपोर्ट करून ११२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांनी घ्यायची काळजी

कोणतीही पोस्ट किंवा बातमी पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता तपासा, चिथावणीखोर मजकूर टाळा, कोणत्याही जात, धर्म किंवा पक्षाबद्दल अवमानकारक टिप्पणी किंवा द्वेषपूर्ण मजकूर पोस्ट करू नका, व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रुप अॅडमिनवर असेल. त्यामुळे ओनली अॅडमिन सेटिंगचा वापर करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT