Paithan News : केंद्राचे कर्मचारी सावलीत, ज्येष्ठ नागरिक भर उन्हात file photo
छत्रपती संभाजीनगर

Paithan News : केंद्राचे कर्मचारी सावलीत, ज्येष्ठ नागरिक भर उन्हात

एसटी सवलत स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठांसह महिलांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

The plight of women including senior citizens in getting ST concession smart cards

पैठण, पुढारी वृत्तसेवा :

बस प्रवासदरम्यान सवलतीचा लाभघेण्यासाठी राज्य परिवहन विभागाचे स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आल्याने पैठण येथील बस स्थानकावर हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना भर उन्हात ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे. केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी सावलीची व्यवस्था आहे हे समाधानकारक असले तरी ज्येष्ठा नागरिकांना मात्र भर उन्हात ताटकळत थांबावे लागत असल्याचे संतापजनक चित्र पहावयास मिळते.

आधार कार्डवर अधिक वय टाकून राज्य परिवहन महामंडळाच्या बस सवलत लाटणाऱ्यां प्रवाशांना राज्य शासनाकडून निर्बंध टाकण्यासाठी या सवलतीच्या योजनेत बदल करण्यात आला आहे. महार राष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून महिलांना ५० टक्के, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना विनामूल्य आणि विद्यार्थ्यासाठी ६६.६६ पर्यंत बस प्रवास सवलत देण्यात येतो. सवलतीसाठी राज्य परिवहन विभागाने बस स्थानकावर खासगी एजन्सीमार्फत स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

येथील बस स्थानकावर हे केंद्र पोलिस चौकीत सुरू झाले परंतु केंद्र चालक सावलीत तर प्रवास सवलतीसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, महिला यांना उन्हात उभे राहण्याची वेळ आली आहे. बस स्थानकाच्या केंद्रावर कुठल्याही प्रकाराची व्यवस्था करण्यात न आल्यामुळे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना भर उन्हात ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

सध्या मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढत असून आरोग्य विभागाकडून या उन्हाळ्यामध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जात असताना राज्य परिवहन महामंडळाकडून मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्मार्ट कार्ड घेण्यासाठी आलेल्या प्रवासी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT