The Municipal Corporation cracked down on encroachments on three roads in the Paithangate area on Wednesday.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पैठणगेट भागातील तीन मार्गावरील अतिक्रमणावर महापालिकेकडून बुधवारी (दि.१९) हतोडा चालवण्यात आला. पोलिस बंदोबस्तात पैठणगेट पार्किंगलगाया मोचाईल चाजार जेसीची प पीकलेनच्या सहाय्याने एकामागोमाग एक जमीनदोस्त करण्यात आला. यासह सब्जीमंडीचा रस्ता मोकळा केला, खोकडपुरा रस्त्यावरील बांधकामाची पाडापाडी करण्यात आली. अयप्पा दोन तासका बहुतेक दुकानांचे अस्तित्व नाहीसे झाले असून, दिवसभरात ११८ अतिक्रमणे पाडण्यात आल्याने पैठणगेट भागातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
किरकोळ आदातून पैठणगेट परिसरात गेल्या आठवडयात तरुणाचा निघूण खून झाल्यानंतर मनपा प्रशासन सतर्क झाले. या घटनेनंतर परिसरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटवण्याची नागरिकांकडून मागणी करण्यात आल्याने ते हटवण्याचा निर्धार प्रशासनाने केला होता. त्यानुसार दिलेल्या नोटीसचा कालावधी संपताच बुधवारी मनपाच्या पथकाने पोलिस बंदोवत्त्वात पैठणगेट बरोल मोबाईल बाजार उठला. यासोबत सब्जी मंडीचा रस्ता मोकळा केला. तसेच खोकडपुरा रस्त्यावरील बांधकामांची पाडापाडी करण्यात आली.
दिवसभरात शंभर दुकाने पाहण्यात आली. दरम्यान, सबंचि लक्ष लागून असलेल्या सनी सेंटरच्या मालमत्ताधारकांनी बांधकाम परवानगी असल्याने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे या इमारतीवर कारवाई केली नसल्याची माहिती अतिक्रमण विभागप्रमुख संतोष बाहुळे यांनी दिली, महापालिकेची पाच पथके बुधवारी सकाळी १० : ३० वाजता अतिक्रमण विभागप्रमुख संतोष बाहुळे यांच्या नेतृत्वाखाली परिसरात दाखल झाली. पोलिस बंदोबस्त, नागरी मित्र पथकाचे माजी सैनिक, तसेच दहा जेसीबी, दोन पोकलेन, दहा टिप्पर या मोठ्या ताफ्यासह कारवाई करण्यात आली. यावेळी तरुणाचा खून ज्या दुकानासमोर झाला, त्या दुकानावर प्रथम बुलडोझर चालवला गेला. त्यानंतर शेजारील सर्व दुकाने जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने एकामागोमाग एक पाडण्यात आली.
यान पैठणगेट पार्किंगशेजारील प्रसिद्ध ज्युस सेंटर, त्यालगतची पक्षीविक्री दुकाने तसेच मोबाईल रिपेअर व इलेक्ट्रिकल दुकाने महापालिकेच्या कारवाईत जमीनदोस् करण्यात आली. अनधिकृत स्टॉलमुळे पूर्णपणे अरुंद झालेला सब्जीमंडीचा माम प्रथमच मोकळा झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. ही कारवाई नगररचन् विभागाचे उप संचालक मनोज गर्जे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, मनपा सहायक आयुक्त सवित सोनवणे, अशोक गिरी, रमेश मोरे, सय्यद समीउल्लाह, भारत बिरारे, नईम अन्स ारी, अतिक्रमण समनव्य अधिकारी संजय सुरडकर व इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, सय्यद जमशेद, नगररचन विभागाचे सौरभ साळवे, सुरज सवंडकर, राहूल मालखेडे, शिवाजी लोखंडे पीआरओ तौसिफ अहेमद व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव यांच्या उपस्थितीन करण्यात आली.
तीन कुटुंब, आठ दुकानांचे मनपाच्या अर्धवट स्ट्रक्चरवरचे अतिक्रमण भुईसपाट दलालवाडी ते खोकडपुरा मार्गावर महापालिकेकडून रस्त्याच्या जागेवरच इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. दोन मजले पूर्ण झाल्यानंतर इमारत रस्त्यामध्ये बांधण्यात येत असल्याचे नगररचना विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे इमारतीचे बांधकाम अर्ध्यावरच सोडून दिले. अनेक वर्षांपासून स्ट्रक्चर उभे असल्यामुळे या स्ट्रक्चरमधील तळमजल्यावर परस्पर सात ते आठ दुकाने सुरू करण्यात आली होती. तसेच तीन कुटुंबाने वरच्या मजल्यावर संसा थाटला होता.
आज पाडापाडीदरम्यान हे लक्षात आल्यानंतर मनपाने बांधून ठेव लेले स्ट्रक्चर भुईसपाट करण्यात आले. कारवाईतून सनी सेंटर तूर्तास वगळले पैठणगेटच्या कोपऱ्यावर असलेल्या सनी सेंटर इमारतीवरही कारवाईच नियोजन होते. मात्र इमारत मालकाने न्यायालयात धाव घेतल्याने आजची कारवा टळली. इमारतीला परवानगी असली तरी भोगवटा प्रमाणपत्र नाही, तसेच वरचा मजला अनधिकृत असून, धोकादायक होर्डिंगही लावण्यात आले असल्याच माहिती अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली.