Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन शालेय मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार.

पुढारी वृत्तसेवा

The man who assaulted a minor girl has been arrested.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन शालेय मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणात आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, शाहरुख सिकंदर पठाण (२३, रा. गल्ली नं. १०, मिसारवाडी) असे आरोपीचे नाव असून त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी दिले.

प्रकरणात १६ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पाच ते सहा महिन्यांपूर्वी पीडितेची शाहरुख पठाण याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर मोबाईलवर बोलणे सुरू झाले. आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती; मात्र पीडितेने त्याला नकार दिला.

दरम्यान, १ जानेवारी रोजी सकाळी आईसोबत शाळेत गेलेल्या पीडितेला आई निघून गेल्यानंतर आरोपी तेथे आला. लग्नाबाबत बोलायचे असल्याचे सांगत त्याने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि शेंद्रा परिसरातील वरुड काझी गावाजवळील कांद्याच्या गोडाऊनवर घेऊन गेला व तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. घटनेनंतर पीडिता रडत असताना स्थानिक नागरिक तिच्या मदतीला धावून आले.

त्यांनी पीडितेच्या आई व नातेवाइकांना बोलावून घेतले. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपी शाहरुक पठाण याला अटक करून न्यायालयात हजर केले असता सहाय्यक लोकाभियोक्ता ए. बी. हिवराळे यांनी आरोपीने गुन्हा करताना परिधान केलेले कपडे व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT