Sambhajinagar News : स्वस्त कपड्यांच्या नादात दुकानात चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती उद्भवली

३ महिला चक्कर येऊन पडल्या, सोशल मीडियावरील जाहिरात दुकानदाराच्या अंगलट
Sambhajinagar News
स्वस्त कपड्यांच्या नादात दुकानात चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती उद्भवलीFile Photo
Published on
Updated on

In the rush for cheap clothes, a stampede-like situation occurred in the store

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आकाशवाणी येथील फ्रिडम टॉवरमध्ये एका नवीन कपड्याच्या दुकानाचे रविवारी (दि.४) उद्घाटन झाले. या दुकानाने किरकोळ दरात कपडे विकणार असल्याचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

Sambhajinagar News
Municipal Election : संभाजीनगरात मनपासाठी लागणार 4600 ईव्हीएम

या जाहिरातीला भुलून केवळ शहरातीलच नव्हे, तर जालना, वाशीम, परभणी आणि नांदेड यासारख्या दूरच्या जिल्ह्यांतूनही शेकडो महिला सकाळीच दुकानासमोर जमा झाल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास दुकानाचे शटर उघडताच झुंबड उडाली.

Sambhajinagar News
Crime News : इन्स्टाग्रामवर तरुणीची छेड काढणाऱ्याला ठोकल्या बेड्या

दुकानाला प्रवेशासाठी केवळ एकच शटर असल्याने आणि आतमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक घुसल्याने श्वास घेणेही कठीण झाले. प्रत्येक वस्तू मिळवण्यासाठी ग्राहकांची ओढाताण सुरू झाली. या गर्दीत प्रचंड उकाडा आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तीन महिलांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news