Crime News : लाकडाचा भारा उचलून दिला नाही; कोयत्याने हल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : लाकडाचा भारा उचलून दिला नाही; कोयत्याने हल्ला

कन्नड तालुक्यातील जामडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

The load of wood was not lifted; the scythe attacked

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : लाकडाचा भारा उचलून देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने तरुणाला लाकडाने आणि लोखंडी कोयत्याने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील जामडी (घाट) येथे घडली आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फिर्यादी गणेश रायभान धोंगडे (वय ४५, रा. जामडी घाट) हे ५ मे रोजी दुपारी बापू जाधव यांच्या शेतात होते. यावेळी संशयित आरोपी संतोष लक्ष्मण पवार याने फिर्यादीला लाकडाचा भारा उचलून देण्यास सांगितले. फिर्यादीने त्यास नकार दिला असता, संशयित आरोपीने त्यांना शिवीगाळ करून चापट -बुक्यांनी मारहाण केली. इतक्यावरच न थांबता, आरोपीने हातातील ऊस तोडण्याच्या लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या कानावर वार करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

जखमी फिर्यादीने खासगी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर ९ मे रोजी तक्रार दिली. यावरून कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एल. के. गवळी अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT