Sambhajinagar News : श्रीराम मंदिर बालाजी ट्रस्टची जागा १९९१-९२ ला विकली file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : श्रीराम मंदिर बालाजी ट्रस्टची जागा १९९१-९२ ला विकली

मुकुंद कुलकर्णीचा गौप्यास्फोट, विविध आठ संस्थांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

The land belonging to the Shriram Mandir Balaji Trust was sold in 1991-92

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जाधववाडी मोंढ्यालगत गट नंबर असलेल्या श्री रामचंद्र मंदिर (मठ) बालाजी ट्रस्टची ४१ एकर वर्ग २ ची जागा आहे. १९९१-९२ सालीच ट्रस्टने आठ ते दहा सोसायटींना विक्री केली होती. त्या सोसायटींनी ही जागा आम्हाला विक्री केल्याचा गौप्यस्फोट मुकुंद कुलकर्णी यांनी केला आहे. त्यामुळे अब्जावधी रुपये किमतीच्या या जागेचा नेमका घोटाळा काय आहे आणि अद्याप मंदिर ट्रस्टी व महापालिकेने यात गुन्हा दाखल केला नसल्याने संपूर्ण प्रकरणच संशयास्पद असल्याचे दिसत आहे.

शहरात सध्या अनेकांचे लक्ष सरकारी वर्ग २ च्या जागेवर आहे. शहरालगतच्या अनेक सरकारी गायरान आणि विविध प्रकारच्या वर्ग २ च्या जागांवर बेकायदेशिररीत्या प्लॉटिंग काढून त्यांची विक्री केली आहे. असाच प्रकार सध्या हर्मूलच्या गट नंबर २१८ मध्ये सुरू असून यातही भूमाफियांनी सर्वास बेकायदेशीर प्लॉट विक्री करून नागरिकांची फसवणूक करीत आहे.

मात्र, जाधववाडी परिसरात तर थेट देवाच्याच जागेवर डोळा ठेवत ती जागा ३३-३४ वर्षांपूर्वीच विक्री केली होती. हा प्रकार खुद्द जमिनीवर प्लॉटिंग काढून विक्री करणाऱ्या श्री रामानंद बिल्डर्स अॅण्ड लॅण्ड डेव्हलपर्सचे मुकुंद गंगाधरराव कुलकर्णी यांनी पुढारीशी बोलताना सांगितला. ते म्हणाले की, या जागेचा व्यवहार आज झालेला नाही.

त्यावेळच्या मंदिर ट्रस्ट्रींनी ही मंदिराची जागा १९९१-९२ साली दहा सोसायटींना विक्री केली होती. यात त्यावेळचे ट्रस्टचे अध्यक्ष आणि सचिव यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात उच्च न्यायालयानेही काही आदेश दिले होते, असे देखील कुलकर्णी यांनी सांगितले आहे. दरम्यान, ही जागा खितदत मास प्रकारात मोडते.

त्यामुळे जागा मंदिर ट्रस्टींना विक्री करता येत नाही. असे असतानाही मंदिर ट्रस्टींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एनएच्या एनओसीसाठी अर्ज केला होता. तो अर्ज कशासाठी केला होता, असा देखील आता प्रश्ननिर्माण होत आहे. एकंदरीत या देवाच्या जागेवर नेमका डोळा कोणाचा, तसेच ही जागा विकता येत नसताना ती ३३ वर्षांपूर्वी विक्री केली कशी, त्यावर एनएसाठी परवानगी मागितली कोणी असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहे.

खिदमतमाश विक्री होत नाही सरकारी वर्ग २ जमिनींच्या प्रकारांमध्ये खिदमतमाशची जागा मंदिर विश्वस्तांना वर्ग १ करता येत नाही. तसेच ही जागा विक्रीदेखील करता येत नाही.
संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय

कडक कायदा होणार

येत्या डिसेंबर महिन्यात शासन खिदमतमास जागेच्या प्रकारासाठी विधिमंडळात आणखीच कडक कायदा करणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू असल्याचे संकेत गेल्या आठवड्यातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT