चिकलठाण्यातील अवैध कत्तलखाना जमीनदोस्त File Photo
छत्रपती संभाजीनगर

चिकलठाण्यातील अवैध कत्तलखाना जमीनदोस्त

मनपा पथकाची कारवाई, मोठा हॉल भुईसपाट

पुढारी वृत्तसेवा

The illegal slaughterhouse in Chikalthana has been demolished.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा परिसरात सुखना नदीपात्रालगत विनापरवाना सुरू असलेला अनधिकृत कत्तलखाना अखेर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी (दि.२६) जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केला. बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याचे उघडकीस आल्यानंतर महापालिकेने ही ठोस कारवाई केली. या कत्तलखान्यातील प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता.

चिकलठाणा येथे विनापरवाना, बेकायदेशीरपणे कत्तलखाना उभारून त्यामध्ये जनावरांची कत्तल सुरू होती. दोन दिवसांपूर्वी या कत्तलखान्यात गोवंश घेऊन जाणारा टेम्पो गोरक्षकांनी पकडून चार गोवंशाची सुटका केली. त्यानंतर पोलिस पथक व मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाने गुरुव-ारी (दि. २५) अनधिकृत कत्तलखान्यावर धाड मारून ३५ किलो मांससह जनावरांचे अवशेष जप्त केले. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने अनाधिकृत कत्तलखाना इमारतीवर जेसीबीने कारवाई केली. यात १२ बाय ४५ असा बांधलेला मोठा हॉल भुईसपाट केला.

हॉल लगतच्या दोन खोल्याही पाडण्यात आल्या. ही कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त संजय सुरडकर, रवींद्र देसाई, सय्यद जमशीद व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT