The Heatwave Intensifies: These Measures Will Prove Lifesaving
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : येत्या कालावधीत उन्हाळ्यात तापमान वाढ होऊन त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. या उष्मा लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
यंदा मार्च महिन्यातच तापमान चाळिशीच्या घरात गेले आहेत. येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
उष्मा लाटेपासून स्वतःचा व आपल्या आप्तेष्टांच्या बचावासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना अवलंबाव्या, याची माहिती देत योग्य काळजी घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन विधाते यांनी केले आहे.
काय करावे?
पुरेसे पाणी प्या. दर अर्ध्या तासाने पाणी प्या.
घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान शक्यतो घराबाहेर जाणे टाळा.
सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरा-वेत.
प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.
ओआरएस, लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.
गुरांना छावणीत ठेवावे, पिण्यास त्यांना पुरेसे पाणी द्यावे.
सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे.
काय करू नये?
उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.
दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.
OF 120 दुपारी १२ ते ३ या वेळे दरम्यान
घराबाहेर जाणे टाळा.
उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे.