Heatwave Strikes : उन्हाचा वाढला तडाखा, पारा ४० अंशांपार  file photo
छत्रपती संभाजीनगर

Heatwave Strikes : उन्हाचा वाढला तडाखा, पारा ४० अंशांपार

यंदाच्या मौसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

The heat of the sun has increased, the mercury has crossed 40 degrees

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा अवकाळीच्या शिडकाव्यानंतर शहराचा पारा पुन्हा एकदा वाढत आहे. शनिवारी शहराचे कमाल तापमान ३९.४ अंशांपर्यंत वाढले, तर रविवारी शहराचे तापमान चाळीशीपार होऊन ४०.६ अंश सेल्सिअसच्या उच्चांकावर पोहोचले. यंदाच्या मौसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. उष्णतेच्या लाटांमुळे दिवसभर असह्य चटके आणि झळा बसत होत्या.

एक एप्रिल रोजी शहराचा पारा ३८.० अंश सेल्सिअसवर कायम असल्याने तापमान लवकरच चाळीशीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली होती. तीन दिवसांपूर्वी गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सिअसवर होते. शुक्रवारी कमाल तापमान ३७.९ अंशांपर्यंत वाढले. तर शनिवारी ३९.४ अंश सेल्सिअस होते.

रविवारी पारा चाळीशीपार करून ४०.४ च्या उच्चाकांवर पोहोचला. मौसमातील हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. त्यामुळे शहरवासीयांना दिवसभर उन्हाचे चटके बसत होते. किमान तापमानही २३.८ अंशांवर गेल्याने उकाड्यानेही शहरवासीयांना हैराण केले. दरम्यान, पुढील काही दिवस असेच उष्ण वातावरण राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT