Sambhajinagar News : महापालिकेच्या ४२ लिपिकांवर पदावनतीची टांगती तलवार  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : महापालिकेच्या ४२ लिपिकांवर पदावनतीची टांगती तलवार

टायपिंग परीक्षेत दुसऱ्यांदा नापास : पुढील निर्णय आयुक्तांच्या हाती

पुढारी वृत्तसेवा

The hanging sword of demotion on 42 clerks of the Sambhajinagar Municipal Corporation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती व वेतनवाढीशी निगडीत असलेल्या टायपिंग परीक्षेत सलग दुसऱ्यांदा फेल ठरलेल्या ४२ जणांवर पदावनतीची टांगती तलवार आहे. यासंबंधीचा पुढील निर्णय महापालिका आयुक्तांच्या हाती असून, संबंधित लिपिकांनी शुक्रवारी (दि.२२) दुपारी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कार्यालयीन कामानिमित्त बाहेर असल्याने या कर्मचाऱ्यांना माघारी फिरावे लागले.

महापालिकेत वर्षानुवर्षांपासून कार्यरत असलेल्या अनेक लिपिकांना टायपिंगही येत नसल्याचा खळबळजनक प्रकार गतवर्षी आयुक्तांनी घेतलेल्या परीक्षेत समोर आला होता. त्यामुळे या प्रकारानंतर प्रशासकांनी कंत्राटी कामगारांना नोकरीतून काढले. तसेच सेवेत कायम असलेल्यांना वर्षभराची मुदत देत टायपिंग प्रशिक्षण घेण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासकांच्या आदेशानंतरही अनेकांनी टायपिंगकडे दुर्लक्षच केले.

कनिष्ठ-वरिष्ठ लिपिक असलेल्यांना टायपिंगसह संगणक हताळता येणे आवश्यक आहे. मात्र असे असताना बहुतांश लिपिकांना स्वतःचे नावही टाईप करता येत नाही. दरम्यान दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेत ३५ लिपिक अपयशी ठरले आहेत. तर या परीक्षेला ७ जणांनी दांडी मारली होती. अशा ४२ कर्मचाऱ्यांचे प्रकरण सध्या महापालिका आयुक्तांच्या विचाराधीन आहे.

आयुक्तांकडून होणाऱ्या निर्णयानंतरच या कर्मचाऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान नियमानुसार दोनदा अपयशी झालेल्या कर्मचाऱ्यांवर पदावनतीची कारवाई होऊ शकते. त्यामुळे अचानक पदावनती झाल्यास केवळ त्यांचा पगारच कमी होणार नसून, सेवेत असलेल्या स्थानावरही परिणाम होऊ शकतो. यावरून चिंतेत असलेले हे कर्मचारी शुक्रवारी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र ते कार्यालयीन कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. या ४२ लिपिकांचे भवितव्य आयुक्तांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पदावनती होणार की आणखी संधी दिली जाणार हे आयुक्तांच्या निर्णयावरच ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT