Sambhajinagar Crime News : कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीचा पोलिसावर जीवघेणा हल्ला  File photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : लग्नाच्या स्वागत समारंभात नवरदेवावर चाकूने वार

सिल्लोड शहरातील घटना, आरोपी फरार

पुढारी वृत्तसेवा

The groom was stabbed with a knife during the wedding reception

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच्या स्वागत समारंभकार्यक्रमात मामेभावाने नवरदेवावर चाकूने वार केला. ही घटना शुक्रवारी (दि. १) सायंकाळी शहरातील छत्रपती संभाजीनगर नाक्यावरील एस. आर. लॉन्स येथे घडली. दरम्यान लग्नाच्या कार्यक्रमात चक्क नवरदेवावर चाकूने वार केल्याने उपस्थित नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी शनिवारी (दि. २) दुपारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अरबाज पठाण अजीज पठाण (२२, रा. पाणी फिल्टर टाकीसमोर, गुलशननगर, सिल्लोड) असे जखमी नवरदेवाचे नाव आहे. तर यासीन पठाण अफसर पठाण (रा. ईदगाहनगर, सिल्ल ोड) असे चाकूने वार करणाऱ्या आर-ोपीचे नाव आहे. फिर्यादी अरबाज पठाण यांचे गुरुवारी (दि. ३१) सकाळी लग्न पार पडले.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री शहरातील एस. आर. लॉन्स येथे लग्नाचे रिसेप्शन (वलीमा) कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. रिसेप्शन कार्यक्रमात नातेवाईक भेटून शुभेच्छा देत होते. लॉन्समध्ये नातेवाईकांची गर्दी जमलेली होती. या दरम्यान आरोपी भेटण्यासाठी आला.

फिर्यादी नवरदेवाने आरोपीला भेटण्यासाठी हात पुढे केला. मै तुझे छोडूंगा नही असे म्हणत आरोपीने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढत नवरदेवाच्या पाठीवर वार केला. यात फिर्यादी नवरदेव जखमी झाला. नातेवाईकांनी तातडीने जखमी नवरद-वाला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शे-षराव उदार, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कार्यदे यांनी आरोपीच्या घरी गेले. मात्र तो सापडला नाही. पोलिस त्याचा शोध घेत असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शे-षराव उदार करीत आहेत

अनैतिक संबधातून चाकू हल्ला

दरम्यान आरोपी त्याच्या पत्नीशी एका वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. यातून मी तुला सोडणार नाही, अशी धमकीही त्याने दिली होती. पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरुन आरोपीने थेट चाकूने वार केल्याचे दिलेल्या तक्रारीत फिर्यादी अरबाज पठाण यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT