शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे file photo
छत्रपती संभाजीनगर

CM Devendra Fadnavis : शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : उद्योजकांकडून ६.१८ कोटींची मदत

पुढारी वृत्तसेवा

The government stands firmly behind the farmers Chief Minister Devendra Fadnavis

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी उद्योजक सरसावले आहेत. मराठवाड्यातील उद्योजकांनी रविवारी (दि.१) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ६ कोटी १८ लाख रुपयांचा मदतनिधी दिला. या योगदानाबद्दल आभार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या संकटात शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी लक्षात घेऊन उद्योजकांनी सामाजिक बांधिलकीतून हा निधी संकलित केला. संकलित निधीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना धीर देणे आणि त्यांच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शेतकरी हिताची प्रेरणा मिळते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून संघर्ष, स्वाभिमान, लोककल्याण आणि शेतकरीहिताची प्रेरणा मिळते. याच विचारांवर शासन काम करीत असून, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT