लोककला महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन File Photo
छत्रपती संभाजीनगर

लोककला महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन

लोककवी प्रशांत मोरेच्या कवितांना रसिकांची दाद

पुढारी वृत्तसेवा

The folk art festival was inaugurated with great fanfare

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आई-बाप, संविधान, प्रेम आणि दुःख या साऱ्या विषयांना कवेत घेणाऱ्या एकाहून एक काव्यरचना सादर करून लोककवी प्रशांत मोरे यांनी पहिल्या लोककला महोत्सवाचे रविवारी (दि.११) उद्घाटन केले. अत्यंत दर्जेदार कवितांना रसिकांनी दाद देऊन नाट्यगृहात जल्लोष केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने पहिला केंद्रीय लोककला कुलगुरु डॉ. विजय फुलारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महोत्सवाचे आयोजन केले आहे होते. यावेळी प्रकुलगुरु डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. गजानन सानप, प्राचार्य डॉ. गौतम वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. पाटील, संचालक डॉ. कैलास होती.

अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती मातींचा सुगंध आणि पूर्वजांचा वारसा घेऊन आलेली लोककला हीच खरी सर्व कलांचा मुलाधार असते, हे संयोजक डॉ. कैलास अंधुरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. हाच धागा पुढे घेऊन लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी उद्घाटनपर भाषणात प्रेम ते विद्रोह अशा विविध कविता सादर केल्या.

यावेळी एका कुंकवापाई दुरं मैना उडुनं जाईलं, याद येता तुझी मैना राघु एकला राहीलं... तुझ्या नावाचं गोंदणं हातावरी मी मिरवीनं, याद येता तुझी मैना हात मायेनं फिरवीनं, या कवितेला उपस्थितांनी दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी तर कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले.

लोककला अकादमी स्थापन करणार : कुलगुरु

राज्यातील सर्व २४ विद्यापीठांमधील विद्यार्थी लोककलांना एकाच मंचावर आणण्यासाठी कुलपती यांनी आपल्या विद्यापीठावर जबाबदारी टाकली आहे. नाट्यगृहाच्या बाजूलाच स्वतंत्र लोककला अकादमी स्थापन करण्यात येणार असल्याचे कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT