Sambhajinagar News :'बाग बनी बेगम' स्मारकाचे प्रवेशव्दार पाच वर्षांनंतर उघडले  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News :'बाग बनी बेगम' स्मारकाचे प्रवेशव्दार पाच वर्षांनंतर उघडले

बाग बनी बेगम स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार अखेर तब्बल ५ वर्षे, ४ महिने आणि ८ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

The entrance to the 'Bagh Bani Begum' memorial opened after five years

खुलताबाद, पुढारी व्रतसेवा : येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या बाग बनी बेगम स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार अखेर तब्बल ५ वर्षे, ४ महिने आणि ८ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रविवारी (दि. ३) सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात बंद झालेला हा दरवाजा गेल्या अनेक वर्षांपासून बंदच होता. त्यामुळे पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना एका छोट्या खिडकीतून आत-बाहेर जावे लागत होते. यामुळे नाराजीचा सूर अनेकदा व्यक्त करण्यात आला होता.

काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते इकबाल पटेल यांनी या संदर्भात तहसीलदारांकडे मागणी केली होती. तहसीलदारांनी पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांना पत्र पाठवून दरवाजा उघडण्याची विनंती केली होती. मात्र काही अडचणींमुळे तो निर्णय लांबणीवर पडत होता.

अखेर स्थानिक प्रशासन, पुरा-तत्त्व विभाग आणि स्मारक व्यवस्थापन यांच्यातील समन्वयातून हा ऐतिहासिक दरवाजा पुन्हा खुला झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT