Sillod News : भोवळ आल्यानंतर चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबविली file photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod News : भोवळ आल्यानंतर चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबविली

सिल्लोड : शहराजवळील प्रवासी तीसले

पुढारी वृत्तसेवा

The driver stopped the bus by the side of the road after feeling dizzy

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : धावत्या बसच्या चालकाला भोवळ आली. मात्र त्याआधीच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला थांबवली व मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी (दि. २३) सकाळी अकराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील शहरालगत असलेल्या काळे पेट्रोल पंपाजवळ घडली. दरम्यान, बसमध्ये जवळपास ३० प्रवासी होते. सिल्लोड आगाराची बस (एमएच-१४, बीटी-२३८०) छत्रपती संभाजीनगरकडून सिल्लोडकडे येत होती.

या दरम्यान महामार्गावरील काळे पेट्रोल पंपाजवळ चालक आनंदराव पेंदूर यांना अचानक भोवळ आली. मात्र, त्याआधी घाम आल्याने चालकाला भोवळ येत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि काही क्षणांतच त्यांना भोवळ येऊन ते बसच्या स्टेअरिंगवर कोसळले. हा प्रकार पाहून बसमधील प्रवासी घाबरले. वाहक किशोर वाणी व प्रवाशांनी चालकाला तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले.

तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सिल्लोड आगाराची ही बस दररोज रात्री सिल्लोडहून बुलढाणा येथे मुक्कामी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बुलढाण्याहून छत्रपती संभाजीनगरला, तर तेथून परत सिल्लोडला येते. यानंतर चालक व वाहक यांना सुट्टी असते, अशी माहिती आगारातून मिळाली. चालकाची प्रकृती उत्तम असल्याचे कळते. दरम्यान, महामार्गावर बस थांबल्याने व प्रवाशांची धावपळ पाहून रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT