Dead Rat : सीईओंच्या दालनात मेलेला उंदीर अखेर सापडला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Dead Rat : सीईओंच्या दालनात मेलेला उंदीर अखेर सापडला

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या दालनात दुर्गंधीचे कारण ठरलेला मेला उंदीर अखेर आढळून आला.

पुढारी वृत्तसेवा

The dead rat in the CEO's cabin was finally found

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या दालनात दुर्गंधीचे कारण ठरलेला मेला उंदीर अखेर तब्बल १२ तासांच्या शोधानंतर बुधवारी छतावरील पीओपीमध्ये आढळून आला.

उंदीर हटविल्यानंतर दालनातील दुर्गंधी कमी झाली आणि कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मंगळवारी सीईओंच्या दालनात अचानक तीव्र दुर्गंधी पसरल्याने कामकाजात अडथळा निर्माण झाला होता.

दुर्गंधीमुळे सीईओ मिन्नू पी. एम. यांनी दालन रिकामे करून अजिंठा सभागृहातून प्रशासकीय कामकाज सुरू ठेवले. दरम्यान, बुधवारी सकाळपासून कर्मचारी दुर्गंधीच्या स्रोताचा शोध घेत होते. अखेर छतावरील पीओपीमध्ये मेलेला उंदीर असल्याचे आढळून आले. तो बाहेर काढल्यानंतर दालनातील दुर्गंधी हळूहळू कमी झाली आणि परिस्थिती पूर्ववत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT