Bribe Case : लाचखोर कार्यकारी अभियंता २४ तासांत निलंबित ! File Photo
छत्रपती संभाजीनगर

Bribe Case : लाचखोर कार्यकारी अभियंता २४ तासांत निलंबित !

राज्य सरकारची कारवाई : स्वीकारत होता एक लाखाची लाच

पुढारी वृत्तसेवा

The corrupt executive engineer was suspended within 24 hours!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गोदावरी मराठवाडा विभागातील कार्यकारी रोहित देशमुख अभियंता रोहित प्रल्हाद देशमुख (रा. प्लॉट नं. ५०, विद्यानगर सेव्हनहिल, छत्रपती संभाजीनगर) असे निलंबित करण्यात आलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव असून, लघुपाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांनी याबाबत माहिती दिली.

अधीक्षक अभियंता शिंगाडे यांनी सांगितले की, तक्रारदार शेतकऱ्याची जमीन पुनर्वसनासाठी शासनाने संपादित केली होती. या जमिनीच्या मोबदल्यापोटी २९ जुलै २०२५ रोजी शेतकऱ्याच्या बँक खात्यात १ कोटी ८८ लाख ३६ हजार ९४ रुपयांचा मावेजा जमा झाला होता. ही रक्कम जमा झाल्याच्या बदल्यात कार्यकारी अभियंता रोहित देशमुख याने चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्याकडे तब्बल सात लाख रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदार शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर एसीबीने ३० डिसेंबर रोजी वाटूर फाट्याजवळील हॉटेलमध्ये पडताळणी केली. १ जानेवारी रोजी अभियंता रोहित देशमुख याला कार्यालयातील दालनात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचेची रक्कम जेवणाच्या डब्यात ठेवताच एसीबीने सापळा रचून कारवाई केली. अंगझडतीत रोख ७,९१० रुपये व दोन मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

असा आहे कारवाईचा घटनाक्रम

पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जालना लघुपाटबंधारे शेतकऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेल्याची घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणाची राज्य सरकारने तात्काळ गंभीर दखल घेत संबंधित लाचखोर अभियंत्याला २४ तासांच्या आत निलंबित केले आहे.

४ लाख रुपये घेतल्याचेही तपासात निष्पन्न

दरम्यान, त्याच दिवशी तक्रारदाराकडून चार लाख रुपये घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर उर्वरित तीन लाख रुपयांसाठी आरोपी अभियंता वारंवार तगादा लावत होता. विशेष म्हणजे, पुनर्वसनात गावठाणातील घरासाठी शासनाने दिलेल्या मावेजाचा चेक देण्याच्या नावाखाली अॅडव्हान्स म्हणून तक्रारदाराकडून सही केलेले दोन कोरे चेकही घेतल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT