Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचा देशात डिजिटल स्फोट file photo
छत्रपती संभाजीनगर

Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचा देशात डिजिटल स्फोट

केंद्रस्थानी संभाजीनगरचा अभिजीत दिपके, दीड कोटी फॉलोअर्स

पुढारी वृत्तसेवा

The Cockroach Janata Party Triggers a Digital Explosion Across the Nation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी नावाच्या व्यंगात्मक राजकीय चळवळीने जोर धरला आहे. या डिजिटल चळवळीच्या केंद्रस्थानी छत्रपती संभाजीनगरचा ३० वर्षीय अभिजीत दिपके हा तरुण आहे. अभिजीतने तयार केलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे चार दिवसांतच तब्बल एक कोटी ६० लाख फॉलोअर्स झाले आहेत. फॉलोअर्सची ही संख्या देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या फॉलोअर्सपेक्षा कितीतरी अधिक आहे.

अभिजीत दिपकेचे मुळ गाव हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी हे आहे. अभिजितचे वडील भगवान दिपके हे छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसीत इंजिनिअर म्हणून सेवानिवृत्त झाले असून, ते सध्या वाळूज येथे वास्तव्यास आहेत. तर अभिजीत हा पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेला आहे. त्याने बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन विषयात नुकतीच मास्टर्स पदवी पूर्ण केली आहे. सोशल मीडिया रणनीती, डिजिटल मोहिमा आणि तरुणांची मानसिकता ओळखण्यात त्यांना विशेष प्राविण्य असल्याचे मानले जाते.

२०२० ते २०२३ या काळात त्यांनी आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक आणि डिजिटल रणनीतीकार म्हणून काम केले होते. देशाचे सरन्यायाधिश सूर्यकांत यांनी तरुणांना झुरळ, असे संबोधले. या वादग्रस्त वक्तव्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात झाली. बेरोजगार आणि बनावट पदवीधारक तरुणांबाबत करण्यात आलेल्या कथित वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. याच पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी १६ मे रोजी मएक्सफ्वर गुगल फॉर्म शेअर करत कॉकरोच जनता पार्टीची घोषणा केली. त्यानंतर १७ मे रोजी इन्स्टाग्राम हँडल सुरू करण्यात आले आणि काही तासांतच लाखो तरुण या मोहिमेशी जोडले गेले.

मुलगा असे काही करेल याची मला कल्पना नव्हती. नव्हती. १७ तारखेला समजले तो डिजिटल मीडियावर पक्ष काढतो म्हणून. एवढे फॉलोवर्स भेटतील, असे वाटले नव्हते. राजकारणाविषयी मला थोडी भीती वाटते, त्याने राजकारणात जायला नको ही माझी प्रांजळ इच्छा आहे. मात्र आता तो माझे मत ऐकणार नाही.
- भगवान दिपके, (अभिजीतचे वडील)
आमच्या मुलाचे काही बरे वाईट होईल म्हणून त्याने राजकारणात जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे. तो आमचा एकुलता एक मुलगा आहे. सध्याचे राजकारण पाहून आणि गढूळ वातावरण पाहून जराशी भीती वाटते.
-अनिता दिपके (अभिजीतची आई)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT