Sambhajinagar News : नेत्यांसह समर्थकांच्या बॅनरने शहर विद्द्रुप  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : नेत्यांसह समर्थकांच्या बॅनरने शहर विद्द्रुप

बॅनर न हटवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे महापालिका आयुक्तांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

The city was filled with banners of leaders and supporters.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:

राजकीय नेत्यांच्या वाढदिवसासह त्यांचे शहरातील आगमनाचे स्वागत व गणेशोत्सावाच्या शुभेच्छा देणाऱ्या बेकायदेशीर बॅनरने शहरातील चौक झाकले गेले आहेत. त्यामुळे शहर विद्रुप होत असून, ते बॅनर अपघातांना निमत्रंण देणारे ठरत आहेत. या बॅनरबाजांवर कारवाई न करणाऱ्या वॉर्ड अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांवर थेट निलंबनाच्या कारवाईचा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे.

शहरात यापूर्वीही विविध बेकायदेशीर बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण झाले होते. त्यावेळी महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून हे बॅनर काढले होते. बॅनरबाजांवर करण्यात आलेली ही कारवाई काही दिवसांसाठी प्रभावी ठरली होती.

तसेच स्वतः माझे फोटो असलेले अनधिकृत पोस्टर बॅनरवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे शहरातील मुख्य चौकांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र काही दिवसांपासून पुन्हा सत्ताधारी नेत्यांनीच अनधिकृत बॅनर लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गल्लीबोळातील स्थानिक मभाईफआणि मदादाफ यांनीही सर्वत्र पोस्टरबाजी सुरू केली आहे. तर अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रांवरही धोकादायक पद्धतीने बॅनर लावण्यात आलेले आहेत.

या प्रकारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. महापालिकेकडून राबवण्यात आलेली मोहीम सत्ताधाऱ्यांपुढे फोल ठरत आहे का, असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान शहराला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी मनपा प्रशासन आणि पोलिसांनी कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अधिकाऱ्यांसह स्वच्छता निरीक्षकांवर कारवाईचा बडगा शहरांमध्ये अनधिकृत पोस्टर बॅनर लावण्यास बंदी करण्यात आली आहे. अशा पद्धतीने कुठे पोस्टर बॅनर लावले असेल तर त्यावर संबंधित वॉर्ड अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक यांनी कारवाई करणे अनिवार्य आहे. तात्काळ याची दखल घेऊन शहरात कुठेही अनधिकृत पोस्टर बॅनर लावले असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. अनधिकृत पोस्टर बॅनर आढळून आल्यास संबंधित वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त यांनी दिलेला आहे.
संतोष वाहुळे, अतिक्रमण विभाग प्रमुख, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT