केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे  file photo
छत्रपती संभाजीनगर

Raksha Khadse : शहराचा सिटी इकॉनॉमिक रिजनमध्ये समावेश

छत्रपती संभाजीनगरसह नाशिक, नागपूर या तीन शहरांचा सिटी इकॉनॉमिक रिजन म्हणून विकास करण्यात येणार असून, या तिन्ही शहरांसाठी प्रत्येकी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

The city is included in the City Economic Region

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

छत्रपती संभाजीनगरसह नाशिक, नागपूर या तीन शहरांचा सिटी इकॉनॉमिक रिजन म्हणून विकास करण्यात येणार असून, या तिन्ही शहरांसाठी प्रत्येकी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी (दि.८) दिली.

भारतीय जनता पक्षाच्या चिकलठाणा येथील विभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, नगर-सेवक समीर राजूरकर, महापालिकेतील गटनेते गोविंद केंद्रे आणि उज्वला दहिफळे यांची उपस्थिती होती.

खडसे यांनी सांगितले की, राज्यातील औद्योगिक, वाहतूक आणि पायाभूत विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरला पालघर येथील वाढवन बंदराशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुध-ारणा व विस्तारासाठी सुमारे ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. दरम्यान, अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा सर्वांगीण कायापालट केला जात असून, यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.

तर मुंबई पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत, व पुणे हैदराबाद प्रवास दोन तासांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट हायस्पीड रेल्वे प्रकल्पाद्वारे साध्य करण्यात येणार आहे. तसेच नागपूर विमानतळाचे अद्ययावतीकरण व शिर्डी विमानतळावर नवीन एकात्मिक टर्मिनल उभारण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण भागात मुलींसाठी विशेष शासकीय वसतिगृहे आणि शी-मार्ट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्पोर्ट्स सायन्स सेक्टर मजबूत करण्यात येणार

क्रीडा क्षेत्रातही मोठे बदल घडवण्यासाठी स्पोर्ट्स सायन्स सेक्टर मजबूत करण्यात येणार असून, प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे युवकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, तर स्पोर्ट्स स्कूलसाठीही विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT