ST Bus File Photo
छत्रपती संभाजीनगर

ST Bus : वाहकांच्या खांद्यावरील तिकीट ट्रेच ओझ हटवलं

ईटीआयएममधून तिकीट देण्याची मुभा

पुढारी वृत्तसेवा

The burden of the ticket tray was lifted from the conductors' shoulders

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एनसीएमसी कार्डात तिकीट काढताना पहिल्याच दिवशी आलेल्या अडचणीमुळे दुसऱ्याच दिवशी सवलतधारकांना कागदी तिकीट देण्याचे फर्मान सोडले होते. दरम्यान याला वाहकांसह संघटनांनी विरोध केल्यामुळे एसटीने नमते घेत तिकिटाचा ट्रे वापरण्याची सक्ती रद्द केली असून ईटीआयएम मशीनमधूनच तिकीट देण्याचे सांगण्यात आले आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिकांना एसटीची सवलत घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड १ सप्टेंबरपासून अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी टॉप अप न होणे. कार्ड रीड न करणे, तसेच टॉप अप मारल्यानंतरही प्रवाशांच्या कार्डात शून्य बॅलेन्स दाखवने अशा तक्रार वाढल्या. याची तत्काळ दखल दुसऱ्याच दिवशी नवीन आदेश काढत १४ सप्टेंबर पर्यंत सवलतधारकांना तिकीट देण्यासाठी वाहकांनी तिकीट ट्रे चा वापर करण्याचे आदेश दिले.

तसेच पुर्ण तिकीट असलेल्या प्रवाशांना मशीनमधूनच तिकीट द्याचे असेही आदेशित केले. एकाच वेळी मशीन आणि कागदी तिकीट अशी दुहेरी भूमिका वाहकांना बजावतांना नाकी नऊ येणार याचा अंदाज घेऊन कामगार संघटना आणि अनेक वाहकांनी याचा विरोध करत येणाऱ्या अडचणीची मांडणी एसटीच्या वरीष्ठांसमोर केली.

याची दखल घेत शुक्रवार पासून तिकीटाचा ट्रे वापरण्याचे आदेश रद्द करण्यात आले असून ईटीआयएम मधूनच महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ३१ ऑगस्टपर्यंत कार्ड नोंदणी केलेल्या पावतीधारकांना तिकीट देण्याचे सांगण्यात आले आहे.

जुन्या पद्धतीचा वापर

स्मार्ट कार्डच्या अडचणीमुळे महिला, ज्येष्ठ आणि पावतीधारकांना कागदी तिकीट देण्याचे आदेशित केले होते. याला वाढता विरोध पाहता कागदी तिकिटांची झंझट संपवण्यात आली असून आता मशीनवरच तिकीट देण्यात येणार आहे. कार्ड आहे आणि तांत्रिक अडचण येत असेल तर पूर्वीप्रमाणे तिकीट काढण्याचे ऑप्शन सक्रिय करण्यात आल्याने वाहकांच्या खांद्यावरील तिकिटाचा ट्रे निघाला आहे.

अपडेट होताच नव्या पद्धतीने एनसीएमसी कार्डमध्ये येणाऱ्या टॉप अप आणि इतर अडची दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम १४ सप्टेंबरच्या आत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT