Vaijapur News : तरुणास नोकरीचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न

वैजापूर तालुक्यातील संशयित संचालकांविरुद्ध विरगाव ठाण्यात तक्रार अर्ज
Crime News
Vaijapur News : तरुणास नोकरीचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्नFile Photo
Published on
Updated on

Vaijapur News : An attempt to convert a young man by luring him with a job

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा नोकरीचे आमिष दाखवून तालुक्यातील एका तरुणाचे बळजबरीने धर्मांतर करून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार वैजापूर तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज पीडित तरुणाने वीरगाव पोलिसांकडे दिला आहे.

Crime News
Crime News : 'लुडो'च्या खेळात 'पेनल्टी'च्या २०० रुपयांवरून रिक्षाचालकांमध्ये राडा; भांडण सोडविणाऱ्याला भोसकले

मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील एका तरुणाला नामांकित संस्थेत. ठिकाणी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून तरुणाने संबंधितांशी संपर्क साधला. सुरुवातीला नोकरीची प्रक्रिया सुरू असल्याचे भासवून त्याच्याकडून विविध काही दिवस उलटल्यानंतर, संशयित आरोपींनी तरुणावर एका विशिष्ट धर्मात प्रवेश करण्यासाठी मानसिक व प्रत्यक्ष दबाव आणण्यास सुरुवात केली.

धर्मांतर केल्यासच नोकरीची संधी मिळेल, असा लोभदेण्यात आल्याचा आरोप तरुणाने आपल्या अर्जात केला आहे. तरुणाने या दबावाला विरोध केला असता, त्याला धमकावण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Crime News
'माझ्याशी बोल, नाहीतर आई-वडिलांना मारून टाकीन'; मुलीला धमकी

आपली फसवणूक झाल्याचे आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, तरुणाने वीरगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याने दिलेल्या लेखी अर्जात संबंधित संस्थेचे संचालक मंडळ आणि या प्रकारात सहभागी असलेल्या सर्व घटकांवर तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या अर्जावरून पोलिसांनी तपास सुरू केला असून, प्रकरणातील सत्यता तपासून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news