The boiler at the Devgiri sugar factory in Phulambri has caught fire again.
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : येथील देवगिरी साखर कारखान्याचे गुरुवारी (दि. पाच) १४ बॉयलर अग्निप्रदीपन झाले. कारखान्याच्या चिमणीतून अनेक वर्षांनंतर दिवसभर धूर पहावयास मिळाला. आमदार अनुर-ाधा चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक प्रसंगी कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
कारखान्याचे चेअरमन कल्याणराव चव्हाण व त्यांच्या पत्नी पद्मा चव्हाण यांच्या हस्ते विधिवत होम हवन करून हा बॉयलर पेटवला. यावेळी आ. अनुराधा चव्हाण, अतुल चव्हाण, प्रशासकीय संचालक नितीन देशमुख, योगेश मिसाळ यांची उपस्थिती होती.
आमदार अनुराधा चव्हाण व अतुल चव्हाण यांनी कारखान्यावर प्रशासकीय त्रिसदस्यीय संचालक मंडळ आणले व राज्य शासनाची मदत घेऊन हा कारखाना चालविण्याची परवानगी घेतली सतत पाठपुरवठा करून सर्व काम केले. यावेळी बाळासाहेब सोटम, ज्ञानेश्वर जाधव, मधुकरराव मुळे, निखिल चव्हाण, विजय मोरे, वाल्मिक जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान, हा कारखाना चालू व्हावा असे इतर नेते फक्त इच्छा व्यक्त करीत मात्र याचा परिणाम इतर कारखान्यावर होऊ शकतो म्हणून कारखाना बंद ठेवण्याचे प्रयत्न झाले असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आमदार अनुराधा चव्हाण व अभियंता अतुल चव्हाण यांनी स्व. अजित पवार यांचे मावसभाऊ नितीन देशमुख यांना बरोबर घेऊन कारखाना सुरू केला.
मशिनरी गेल्या होत्या चोरीला
गेल्या १४ वर्षांपासून कारखाना पूर्णपणे बंद आहे. यात जवळपास मशिनरी व १७५ मोठमोठे विद्युत पंप चोरीस गेले होते. या कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांचे कर्ज होते. त्यामुळे हा कारखाना बँकेच्या ताब्यात होता. मात्र कारखाना मालकीची सावंगी येथील जमीन समृद्धी महामार्गात गेली त्याचा मावेजा ३० ते ३२ कोटी रुपये आला, यात कर्ज फेडणे व इतर देणे घेणे आदी कामे झाली.