पूर्व, फुलंब्रीसह मध्य, पश्चिममध्येही भाजपच File Photo
छत्रपती संभाजीनगर

Muncipal Election News : पूर्व, फुलंब्रीसह मध्य, पश्चिममध्येही भाजपच

चारही विधानसभा मतदार संघांवर वर्चस्व, शिंदेसेनेच्या दोन्ही आमदारांना अपयश

पुढारी वृत्तसेवा

The BJP is dominant in the east, central, and western regions, including Phulambri

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपने शहरात कोणाची ताकद सर्वाधिक आहे, हे जाणून घेण्यासाठी यंदा महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढली. परंतु, त्यात सेनेला चांगलाच धक्का बसला असून आमदार असलेल्या मध्य आणि पश्चिम या दोन्ही विधानसभा मतदारसघांत सेनेला स्वतःचे नगर-सेवक निवडून आणता आले नाही. या मतदार संघात ५८ पैकी २९ नगर-सेवक निवडून आणत भाजपने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत यंदा महायुतीतील प्रमुख शिवसेना-भाजने स्वबळावर निवडणूक लढली. यात भाजपने ११५ पैकी मुस्लिमबहुल भाग वगळून ९२ ठिकाणी उमेदवार दिले होते. तर शिंदेसेनेने तब्बल ९७ उमेदवार दिले होते. परंतु, यात भाजपने सर्वच ठिकाणी योग्य नियोजन करीत उमेदवार दिले. विशेष म्हणजे उमेदवार दिल्यानंतर शिवसेनेपेक्षा मोठा राडा हा भाजपमध्येच झाला. परंतु, त्यानंतर सर्वच इच्छुकांना व बंडखोरांच्या भेटी घेत भाजपच्या नेत्यांनी अतिशय गोपनीय रणनीती आखून आपल्या उमेदवारांच्या प्रभागात मतदार जोडण्यावर भर दिला.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी यंदा ११ दिवसांचा कालावधी ठेवला होता. त्यात निवडणूक प्रमुख तथा ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्त्वात खासदार डॉ. भागात कराड, आमदार संजय केनेकर, आमदार अनुराधा चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रचाराच्या टीम तयार करीत जेथे भाजपचे प्राबल्य कमी आहे. त्या प्रभागांवर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत भाजपने पदयात्रेतून अधिक मतदारांपर्यंत पोहचण्यावर भर दिला. त्यामुळेच भाजपला विजयश्री खेचून आणण्यात यश मिळाल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय यश

पूर्व मतदार संघ २६-२१

पश्चिम मतदार संघ २७-१४

मध्य मतदार संघ ३१-१५

फुलंब्री मतदार संघ ८-७

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT