Water Pipeline : नव्या जलवाहिनीची चाचणी आता सोमवारीच File Photo
छत्रपती संभाजीनगर

Water Pipeline : नव्या जलवाहिनीची चाचणी आता सोमवारीच

ढोरकीनचे स्क्रोल व्हॉल्व्हचे कम पूर्ण, आता निसर्ग नर्सरीसमोरील पाईपचे वेल्डिंग सुरू

पुढारी वृत्तसेवा

Testing of the New Water Pipeline Now Monday

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

नवीन २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या चाचणीवेळी अचानक ढोरकीन येथे स्कोर व्हॉल्व्हचे दोन तुकडे झाले. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू असलेले व्हॉल्व्ह बदलण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले. परंतु, निसर्ग नर्सरीपुढील जलवाहिनीचे गॅप जोडणे शिल्लक असून त्या वेल्डिंगचे काम रविवारी (दि. १२) सायंकाळपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आता चाचणी सोमवारीच होण्याची शक्यता आहे.

शनिवारी सायंकाळी जलवाहिनीवरील स्कोर व्हॉल्व्ह बसवण्याचे काम पूर्ण झाले. परंतु, निसर्ग नर्सरीपासून पुढे नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्राच्या दिशेने जाणाऱ्या जलवाहिनीच्या गॅप जोडणीचे काम शिल्लक आहे. शनिवारी या जोडणीसाठी पाईप टाकण्यात आले आहेत. आता वेल्डिंगचे काम सुरू असून अतिशय बारकाईने ही वेल्डिग करावी लागते. त्यामुळे हे काम रविवारी सायंकाळपर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्रधिकारणाकडून सांगण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत काम पूर्ण झाल्यास पंप सुरू करून चाचणी घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. परंतु, ही शक्यता अतिशय कमी असल्याने सोमवारीच चाचणी होणार आहे.

पाणी जलशुद्धीकरण केंद्रात घेणार नाही

जलवाहिनीच्या गॅपची जोडणी झाल्यानंतर रविवारी सायंकाळी अथवा सोमवारी चाचणी सुरू करण्यात येइल. पाणी नक्षत्रवाडीत आले तरी ते जलशुद्धीकरण केंद्रात घेणार नाही. जलवाहिनीतून पाण्यासोबतच मोठ्याप्रमाणात चिखल, घाण येत आहे. त्यामुळे पाईप स्वच्छ झाल्यानंतर पाणी केंद्रात घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT