Ten polling stations in the city are critical
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी १२६४ मतदान केंद्र स्थापन केले आहेत. त्यापैकी अत्यंत क्रिटीकल असलेल्या १० मतदान केंद्रांची यादी जिल्हा प्रशासनाकडून महापालिका प्रशासनाला प्राप्त झाली आहे. आता पोलिस प्रशासनाकडून संवेदनशील मतदान केंद्रांची यादी प्राप्त होणे शिल्लक आहे. या क्रिटीकल मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी आजपासून (दि. २३) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी नऊ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. मतदानासाठी ३६३ इमारतींमध्ये १२६४ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने शहरातील क्रिटीकल मतदान केंद्रांची यादी मनपा प्रशासनाला पाठवलेली आहे.
त्यात मुकुंदवाडीतील मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा, सिडको एन-९ मधील व्ही. आर, स्कॉलरडेन स्कूल बळीराम पाटील हायस्कूल परिसर एन-९, रोजाबागमधील मौलाना आझाद पोस्ट ग्रॅड्युएट अॅड रिसर्च सेंटर लेक्चर हॉल, मौलाना आझाद सायन्स बिल्डिंग स्टाफ रूम रोजाबाग, तर सातारातील शांतीनिकेतन प्राथमिक शाळा पूर्व भाग खोली नंबर १, शांतीनिकेतन प्राथमिक शाळा पश्चिम भाग खोली नंबर २,
रा-वरसपुर्यातील मनपा प्राथमिक शाळा पडेगाव कॉलनी खोली नंबर-२, जालना रोडवरील सिंचन भवन येथील मुख्य अभियंता जलसंपदा सिंचन भवन पश्चिम भाग मतदान केंद्र, सिडको एन-७मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, पूर्व भाग खोली नंबर-२, सिडको एन-७ मधील द वर्ल्ड स्कूल सिडको एन-६ पश्चिम साईड खोलनंबर-२, टाऊन सेंटर सिडको मधील किलबिल बालक मंदिर सिडको एन-४ दक्षिण साईड खोलीनंबर-२ या केंद्रांचा समावेश आहे.
वेबकास्टिंग, सीसीटीव्ही कॅमेरे
क्रिटीकल १० मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे स्मार्ट सिटीतील कमांड अॅड कंट्रोल रूमशी जोडले जाणार असून, मतदान होईपर्यंत त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.