Teachers' protest in heavy rain for three hours
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांमधील अनियमितता आणि संचमान्यतेविरोधात शिक्षकांच्यावतीने शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भर पावसात तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले.
शिक्षक कृती समितीच्यावतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी कृती समितीने एक निवेदनही दिले.
या आंदोलनात कृती समितीचे दिलीप ढाकणे, राजेश भुसारी, श्रीराम बोचरे, बाबूलाल राठोड, महेंद्र बारवाल, भीमराव मुंडे, संतोष ताठे, सदानंद मांडेवार, संजीव देवरे, गोविंद उगले, संजय शेळके, शिवाजी एरंडे, सुषमा राऊतमारे, सुषमा खरे, ज्ञानेश्वर पठाडे, अनिता उसरे, गणेश सोनवणे
मोतीलाल पवार, राजेश आचारी, अनिल विचवे, मनोहर पठे, विजय ढाकरे, प्रवीण संसारे, शांतीलाल राठोड, रोहिणी विद्यासागर, अनिता उसरे, सुनीता जाधव, वंदना साळवे, प्रवीण अहिरराव, पूनम चव्हाण, संजय बुचुडे, नितीन पाटील यांच्यासह अनेक शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.