Sambhajinagar News : अतिक्रमणाकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : अतिक्रमणाकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

वंचित बहुजन आघाडीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Suspend officials who turn a blind eye to encroachments.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेले अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी पंचायत समितीसमोर १८ मे पासून बेमुदत उपोषण सुरू आहे. यावर ग्रामपंचायत अधिकारी जानेफळ, गटविकास अधिकारी वैजापूर यांनी यावर अद्यापही कारवाई केली नसल्याने त्यांना निलंबित करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी (दि. २२) जिप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अतिक्रमनांबाबत वंचित बहुजन आघाडीच्या गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तरीही ते हेतुपुरस्सर डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती असलेल्या अतिक्रमणांकडे कानाडोळा करत आहेत.

या बाबत १८ मे पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणही सुरू आहे. तरीही अतिक्रमण हटवले नाही. हे अधिकारी राजकीय दबावाखाली मागासवर्गीय लोकांना त्रास देत असून या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी स्वतः लक्ष घालून कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

मुख्यधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, राजन किर्तने, मतीन पटेल, पंकज बनसोडे, राहुल मकासरे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT